Join us  

विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 1:59 AM

विद्यापीठातील ६६९० अधिकारी-कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत नाही.

मुंबई : विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक असून ७व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.मंत्रालयात महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज आॅफिसर्स फोरम, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ, अखिल महाराष्ट्र शैक्षणिक कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांची विविध मागण्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी सामंत बोलत होते.विद्यापीठातील ६६९० अधिकारी-कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत नाही. त्यापैकी तीन टप्पे करून पहिल्या टप्प्यात वित्त विभागाकडून मान्यता घेऊन २ हजार ८३५ लोकांना वेतन देण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येईल. ज्यांच्या वेतनासंदर्भात काही अडचणी आहेत त्याचा आढावा घेऊन दुसºया टप्यात निर्णय घेण्यात येईल आणि न्यायप्रविष्ट प्रकरण संदर्भात न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. सेवांतर्गत आश्वसित प्रगती योजनेच्या तरतुदींमध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या सुधारीत संरचना अनुषंगाने सुधारित नियम लागू करण्याच्या संदर्भात वित्त मंत्री यांच्या उपस्थिती बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येईल, आदी आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले.

टॅग्स :उदय सामंत