विकासाकरिता सात हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2015 22:55 IST2015-06-02T22:55:08+5:302015-06-02T22:55:08+5:30
राज्यातील आदिवासींच्या विकासाकरिता सात हजार १७० कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले असून त्या निधीच्या माध्यमातूनआदिवासींचा सर्वांगीण

विकासाकरिता सात हजार कोटी
बोईसर : राज्यातील आदिवासींच्या विकासाकरिता सात हजार १७० कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले असून त्या निधीच्या माध्यमातूनआदिवासींचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे मत आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी व्यक्त केले.
पालघरचे खासदार चिंतामण वनगा व आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपातर्फे बोईसर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य ओमप्रकाश शर्मा, प्रदेश कार्यकारीणी सदस्य बाबजी काटोळे, जिल्हा सरचिटणीस विजय अवसर, तालुका अध्यक्ष प्रमोद आरेकर, जि. प. पालघरचे कृषी सभापती अशोक वडे, जि. प. सदस्या रंजना संखे, पं. स. सदस्य विपुल पाटील, जितेंद्र संख्ये, सदस्या विणा देशमुख व नेहा शेलार आदिवासी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जगदीश धोडी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्कृती विकास मंडळाचे अध्यक्ष अंकुर राऊत यांनी डहाणू, चिंचणी, तारापूर, घिवली, देलवाडी, बाडापोखरण, उमरोळी, बोईसर आदी परिसरातील कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.
सवरा म्हणाले, भाजपा तळागाळातील कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देतो, त्यांना सन्मान देतो, केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात व काही तालुक्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्या माध्यमातून परिसरातील ज्वलंत समस्या सोडवा. जेथे माझी मदत लागेल तेथे बोलवा परंतु लोकांच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या, असे आवाहन त्यांनी केले.अशोक वडे यांनी परिसरातील समस्या सोडविण्याची विनंती केली. प्रास्ताविक प्रमोद आरेकर यांनी केले.