आगीत सात जण गुदमरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:31 IST2018-03-15T05:31:20+5:302018-03-15T05:31:20+5:30

कांजूरमार्ग पूर्वेकडील स्टेशन रोड येथील रॉयल पार्क इमारतीमध्ये बुधवारी सकाळी ८च्या सुमारास आग लागली. यात सात जण गुदमरले.

Seven people complained of fire | आगीत सात जण गुदमरले

आगीत सात जण गुदमरले

मुंबई : कांजूरमार्ग पूर्वेकडील स्टेशन रोड येथील रॉयल पार्क इमारतीमध्ये बुधवारी सकाळी ८च्या सुमारास आग लागली. यात सात जण गुदमरले.
रॉयल पार्क ही इमारत सोळा मजल्यांची असून, तळाला असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी सात रहिवासी गुदमरले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले.

Web Title: Seven people complained of fire