सातपाटीत समुद्राचे पाणी घरात घुसले

By Admin | Updated: July 14, 2014 23:51 IST2014-07-14T23:51:38+5:302014-07-14T23:51:38+5:30

पावसाच्या वाढत्या जोरासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात निर्माण झालेल्या तुफानी लाटांनी सातपाटीचा संरक्षक बंधारा पार करीत किनाऱ्यावरील घरांचा वेध घेतला

Seven ocean water entered the house | सातपाटीत समुद्राचे पाणी घरात घुसले

सातपाटीत समुद्राचे पाणी घरात घुसले

पालघर : पावसाच्या वाढत्या जोरासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात निर्माण झालेल्या तुफानी लाटांनी सातपाटीचा संरक्षक बंधारा पार करीत किनाऱ्यावरील घरांचा वेध घेतला. त्यामुळे दांडापाडा, क्रांतीमंडळ इ. भागातील मच्छीमारांच्या घरात पाणी शिरून त्यांचे नुकसान झाले.
सातपाटीच्या किनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छीमारांच्या घरांना २००१ साली तुफानी लाटांचा तडाखा बसल्याने माजी केंद्रीय मंत्र्यांनी बीपीसीएल व राज्य शासनाच्या संयुक्तीक लोककल्याणाच्या २ कोटी ८५ लाखांच्या निधीमधून १३९० मीटरच्या संरक्षक बंधारा बांधून दिला होता, मात्र कालांतराने या बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने समुद्राच्या लाटांचा तडाखा किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना बसू लागला होता. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी सहकारी संस्था, ग्रा. पं. यांनी अनेक निवेदने केंद्र व राज्य शासनाकडे दिली होती. मात्र या संदर्भात कुठल्याही उपाययोजना आखल्या जात नव्हत्या. यावर्षी समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने समुद्राने रौद्र रुप धारण करीत लाटांनी संरक्षक बंधारा पार करायला सुरूवात केली होती.

Web Title: Seven ocean water entered the house