Join us

कोविडमधील कथित बॉडी बॅग्स घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची सात तास ईडी चौकशी

By मनोज गडनीस | Updated: January 30, 2024 19:25 IST

या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे.

मुंबई - कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मंगळवारी सात तास चौकशी केली. सकाळी ११ वाजता त्या ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. याप्रकरणी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने त्यांची सहा तास चौकशी केली होती. 

कोविड काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्स या एका खाजगी कंपनीकडून मुंबई महानगरपालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप करत या प्रकरणी ४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. संबंधित खाजगी कंपनीने मृतदेहासाठी तयार करण्यात आलेली बॉडी बॅग मुंबई महानगरपालिकेने ६७१९ रुपये दराने (प्रति बॅग दर) खरेदी केली होती. तर हीच बॉडी बॅग त्याच कंपनीकडून राज्य सरकारच्या अन्य रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात १५०० रुपये प्रति बॅग दराने खरेदी करण्यात आली. या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे.

टॅग्स :किशोरी पेडणेकरअंमलबजावणी संचालनालयमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस