सात सट्टेबाज गजाआड
By Admin | Updated: May 18, 2015 05:13 IST2015-05-18T05:13:41+5:302015-05-18T05:13:41+5:30
सध्या सुरू असलेल्या आयपीएलवर बेटिंग लावणाऱ्या सात सट्टेबाजांना शनिवारी नागपाडा पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या

सात सट्टेबाज गजाआड
मुंबई : सध्या सुरू असलेल्या आयपीएलवर बेटिंग लावणाऱ्या सात सट्टेबाजांना शनिवारी नागपाडा पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन, लॅपटॉप आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.
गेल्या महिनाभरापासून देशात आयपीएलचे सामने सुरू आहेत. त्यामुळे सट्टाबाजारदेखील तेजीत आहे. शनिवारी नागपाडा परिसरातील हॉटेल बॉम्बे इंटरनॅशनल येथे मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याची माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल सायंकाळी हॉटेलमधील रूम नंबर ३०१ आणि ३०२ वर छापा घातला. तेव्हा बेटिंग लावणाऱ्या इंद्रिस कपाडिया (३०) मेहबूब वाकावाल (३२) आशिष पारिख (३५), हानिफ सुमा (३९) दीपक पटेल (३२) विकी कनोजिया (२७) आणि संजय साळुजा (३४) या सात जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून ७१ मोबाइल फोन, दोन लॅपटॉप आणि ३० हजारांची रोख रक्कम देखील हस्तगत केली आहे. पकडण्यात आलेले काही आरोपी गुजरातमधील मोठे सट्टेबाज असून, यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)