Join us

महागड्या भेटवस्तूसाठी गमावले साडेसहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 03:04 IST

गृहिणीची फसवणूक : कांदिवलीतील प्रकार

मुंबई : महागड्या भेटवस्तूसाठी गृहिणीवर साडेसहा लाख गमाविण्याची वेळ आली. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीच्या शिवाजी रोड परिसरात २९ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयासोबत राहतात. त्यांची शॉन डिसिल्वा, कविता आणि नेहासोबत ओळख झाली. ओळखीतून त्यांनी विवाहितेला ६२ लाखांच्या भेटवस्तूचे आमिष दाखविले.

महिलेनेदेखील भेटवस्तूसाठी स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. पुढे भेटवस्तूंसाठी त्यांना विविध करांच्या नावाखाली ६ लाख ४८ हजार उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी करण्यात आली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने बुधवारी कांदिवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.तिघांच्याही फोन कॉल्सनुसार, पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. तिघांचीही पूर्ण नावेदेखील महिलेला माहिती नाही. महागड्या गिफ्टच्या नादात त्यांना लाखोंचा फटका बसला आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनाही धक्का बसला आहे. कांदिवली पोलीस तांत्रिक पुराव्याच्या आधारे अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी