मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर सुविधा वाढवणारा करार नुकताच करण्यात आला. या करारानुसार कर्मचाºयांना पुढील ३ वर्षांसाठी ४,५०० रुपये ते ८,९०० रुपयांपर्यंत वेतनवाढ मिळेल. याशिवाय डीए व १ लाख रुपयांचा वैद्यकीय विमाही मिळणार आहे.भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस संजय कदम व संतोष कदम यांनी पगारवाढीसंदर्भात कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यानुसार क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिस प्रा. लि. व प्रथमेश टेक्नो वर्क फोर्स या दोन कंपन्यांमधील कर्मचाºयांना या कराराचा लाभ मिळेल. या पगारवाढीमुळे कर्मचाºयांचा पगार दरमहा १८ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे.
विमानतळावरील सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना ८,९०० रुपये पगारवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:55 IST