अखेरच्या श्वासापर्यंत मुलुंडकरांची सेवा

By Admin | Updated: October 9, 2014 01:59 IST2014-10-09T01:59:51+5:302014-10-09T01:59:51+5:30

मुलुंड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी मुलुंडकरांची सेवा करत राहाणार, असे प्रतिपादन माजी आमदार व मुलुंडमधील काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा यांनी येथे केले.

The service of Mulundkar till the last breath | अखेरच्या श्वासापर्यंत मुलुंडकरांची सेवा

अखेरच्या श्वासापर्यंत मुलुंडकरांची सेवा

मुंबई : मुलुंड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी मुलुंडकरांची सेवा करत राहाणार, असे प्रतिपादन माजी आमदार व मुलुंडमधील काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा यांनी येथे केले.
मुलुंडमधील केरळा समाजातर्फे ६ आॅक्टोबर रोजी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा सायप्रस, वसंत गार्डनजवळील सेरेमोनियल हॉलमध्ये पार पडला. या सोहळ्यात आयोजक आणि सहभागी विविध संस्थांतर्फे सप्रा यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना सप्रा बोलत होते. सप्रा विधानसभा निवडणुकीत मुलुंडमधून काँग्रेसच्या वतीने लढत आहेत.
या सोहळ्याला केरळा समाज व नायर वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख कुमार नायर, वेणुगोपाल नायर, विजय कुमार, मोहन कुमार नायर, उन्नी कुट्टन, एनएनडीपी समाजाचे प्रमुख दामोदरन, आयप्पा सेवा संघमचे प्रमुख एस. के. मेनन, सी. उदय कुमारन, रामकृष्णन आयप्पा सेवा समितीचे प्रमुख श्रीधरन, भक्त संघमचे प्रमुख परमेश्वरन, बालकृष्णन, कृष्णन यांच्यासह केरळा समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. या सोहळ्यात आयोजकांनी सप्रा यांची ओळख करून देताना त्यांनी मुलुंडमध्ये केलेल्या विकासकामांची यादी उपस्थितांना वाचून दाखवली. या सोहळ्यात उपस्थित केरळा समाजाने विधानसभा लढतीत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: The service of Mulundkar till the last breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.