Join us

कल्याण-कसारादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वे विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 13:28 IST

बिघाड दुरूस्तीचं काम सुरू आहे.

मुंबई- कल्याण-कसारादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. कल्याण ते कसारा दरम्यानची अप व डाऊन लोकल सेवा यामुळे ठप्प झाली असून बिघाड दुरूस्तीचं काम सुरू आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणार झाला आहे. 

आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. कल्याण ते कसारा दरम्यान ओव्हरहेड तुटल्याने या मार्गावरील अप व डाऊन लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम झाला असून काही प्रवाशी रेल्वे रूळावरून चालत जाताना पाहायला मिळत आहेत.