दोन महिन्यांच्या उच्चांकावर सेन्सेक्स
By Admin | Updated: January 13, 2017 00:31 IST2017-01-13T00:31:19+5:302017-01-13T00:31:19+5:30
जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वाढून २ महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला.

दोन महिन्यांच्या उच्चांकावर सेन्सेक्स
मुंबई : जोरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी वाढून २ महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. निफ्टीनेही चांगली वाढ मिळविली.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १0६.७५ अंकांनी अथवा 0.३९ टक्क्यांनी वाढून २७,२४७.१६ अंकांवर बंद झाला. १0 नोव्हेंबरनंतरचा हा उच्चांक ठरला. त्या दिवशी सेन्सेक्स २७,५१७.६८ अंकांवर बंद झाला होता. त्याआधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्स ४१३.८६ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६.५५ अंकांनी अथवा 0.३२ टक्क्यांनी वाढून ८,४0७.२0 अंकांवर बंद झाला.सेन्सेक्समधील ३0 पैकी १३ कंपन्यांचे समभाग वाढले. १७ कंपन्यांचे समभाग घसरले. (वाणिज्य प्रतिनिधी)