सेन्सेक्स किंचित वधारला

By Admin | Updated: June 11, 2014 02:39 IST2014-06-11T02:39:10+5:302014-06-11T02:39:10+5:30

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रत नव्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता;

The Sensex rose slightly | सेन्सेक्स किंचित वधारला

सेन्सेक्स किंचित वधारला

>मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारच्या सत्रत नव्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता; परंतु दुपारच्या सत्रनंतर मोठय़ा प्रमाणात नफेखोरी झाल्याने बाजाराची तेजी कायम राहू शकली नाही. अखेरीस 3.48 अंकांनी वाढून 25,583.69 अंकांवर बंद झाला. अपेक्षेपेक्षा मान्सून कमी होण्याच्या संकेतामुळे बाजारातील वाढ मर्यादित राहिली, असे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. 
3क् कंपन्यांचा समावेश असलेला बीएसई सुरुवातीला मोठय़ा प्रमाणात झालेल्या गुंतवणुकीमुळे 25,711.11 या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता. रियल्टी, तेल आणि गॅस, कॅपिटल गुडस्, ऊर्जा आणि धातू या क्षेत्रत मोठय़ा प्रमाणात नफेखोरी झाली. त्यामुळे बाजार 25,347 र्पयत खाली आला. सत्रच्या अखेरीस बाजार थोडासा सावरला. अखेरीस 3.48 अंकांनी किंवा क्.क्1 टक्क्यांनी वधारून 25,583.69 अंकांवर बंद झाला. सलग चौथ्या सत्रत बाजार वाढीसह बंद झाला. 
अॅक्सिस बँक, एसबीआय, हीरो मोटोकॉर्प, भेल, बजाज ऑटो, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सेसा स्टरलाईट आणि एचडीएफसीसह 16 कंपन्यांचे शेअर्स कोसळले.इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, सिप्ला, सनफार्मा, हिंदाल्को, एचयूएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स आणि एचडीएफसीसह 14 
कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. (प्रतिनिधी)

Web Title: The Sensex rose slightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.