बँकिंग क्षेत्रच्या जोरावर सेन्सेक्सची उसळी
By Admin | Updated: June 3, 2014 00:36 IST2014-06-03T00:36:10+5:302014-06-03T00:36:10+5:30
विदेशी संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी बँकिंग तसेच भांडवली वस्तूंच्या क्षेत्रतील कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेतली.

बँकिंग क्षेत्रच्या जोरावर सेन्सेक्सची उसळी
>467 अंकांची तेजी : विदेशी संस्थांकडून जोरदार खरेदीचा परिणाम; तीन आठवडय़ांचा उच्चांक
मुंबई : विदेशी संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी बँकिंग तसेच भांडवली वस्तूंच्या क्षेत्रतील कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 467 अंकांनी वर चढला. गेल्या तीन आठवडय़ांतील ही सर्वात मोठी तेजी ठरली आहे.
गेल्या आठवडय़ात शेअर बाजारात अस्वलाची मंद चाल होती. आठवडाभरात 400 अंकांपेक्षा जास्त घसरण नोंदली गेली. त्यामुळे सोमवारकडे सर्वाच्याच नजरा होत्या. सोमवारने गुंतवणूकदारांना निराश केले नाही. सकाळीच बाजार तेजीने सुरू झाला तसेच सत्रच्या अखेरीस तेजीनेच संपला.
30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स तेजीने उघडल्यानंतर 24,709.09 अंकांच्या दिवसभराच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. भांडवली वस्तू, पीएसयू, तेल आणि गॅस, धातू तसेच वाहन उद्योगातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सत्रअखेरीस सेन्सेक्स 467.51 अंकांच्या अथवा 1.93 टक्क्यांच्या वाढीसह 24,684.85 अंकांवर बंद झाला. 12 मे नंतर सेन्सेक्सने एका दिवसात घेतलेली ही सर्वात मोठी उसळी आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही आज तेजीत होता. 132.55 अंकांची वाढ नोंदवणारा निफ्टी 7,262.50 अंकांवर पोहोचला. निफ्टीतील ही वाढ 1.83 टक्के आहे. एका क्षणी तो 7,368.60 अंकांवर, दिवसभराच्या सर्वोच्च पातळीवर गेला होता. सत्र संपत असताना तो थोडा खाली आला.
ब्रोकरांनी सांगितले की, मे महिन्यात भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून विदेशी संस्था आणि किरकोळ गुंतवणूकदारांत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैश्विक बाजारातील मजबुतीचाही परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. (प्रतिनिधी)
अन्य आशियाई बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथील बाजार लाभात राहिले. चीन, हाँगकाँग आणि तैवान येथील बाजारांना आज सुटी होती.
4सेन्सेक्समधील एलअँडटी कंपनीचे शेअर्स सर्वाधिक 6.23 अंकांनी वाढले. कंपनीने गेल्या आठवडय़ात जाहीर केलेल्या चौथ्या तिमाहीचा निकाल उत्साहवर्धक राहिला. त्यामुळे कंपनीच्या शेअर्सला तेजीचा लाभ मिळाला. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रचा निर्देशांक 4.93 टक्के, तेल आणि गॅस 2.85 टक्के, वीज 2.38 टक्के, धातू 1.86 टक्के, रिअल्टी 1.43 टक्के वाढला.
4उद्या रिझव्र्ह बँकेचा पतधोरण आढावा जाहीर होणार आहे. रेलिगेअर सिक्योरिटीजचे अध्यक्ष (किरकोळ वितरण) जयंत मांगलिक यांनी सांगितले की, सुरुवातीला जागतिक पातळीवर तेजीची धारणा दिसून आली. त्यामुळे भारतीय बाजारांना बळ मिळाले.
30 मे रोजी विदेशी संस्थांनी शुद्ध स्वरूपात 2,977.62 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळेही बाजाराला बळ मिळाले.
4व्हेरासिटी ब्रोकिंग सव्र्हिसेसचे संशोधनप्रमुख जिगAेश चौधरी यांनी सांगितले की, एलअँडटी व एसबीआय यांसारख्या काही मोठय़ा कंपन्यांतील तेजीवर स्वार झालेला बाजार मजबुतीने वर चढला.
रिझव्र्ह बँक अपेक्षेपेक्षा आधीच व्याजदरांत कपात करील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला जागतिक पातळीवर तेजीची धारणा दिसून आली. त्यामुळे भारतीय बाजारांना बळ मिळाले. 30 मे रोजी विदेशी संस्थांनी शुद्ध स्वरूपात 2,977.62 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळेही बाजाराला बळ मिळाले.