सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी पातळीवर

By Admin | Updated: August 19, 2014 01:18 IST2014-08-19T01:18:57+5:302014-08-19T01:18:57+5:30

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी 288 अंकांची ङोप घेत विक्रमी 26,39क्.96 अंकांवर बंद झाला.

Sensex, Nifty at record levels | सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी पातळीवर

सेन्सेक्स, निफ्टी विक्रमी पातळीवर

मुंबई : बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजीच्या भाषणात पायाभूत क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रवर विशेष भर दिल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी 288 अंकांची ङोप घेत विक्रमी 26,39क्.96 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 83 अंकांची उसळी घेत 7,874.25 अंकावर राहिला.
बाजारातील जाणकारांच्या मते, मोठय़ा अवधीनंतर आज शेअर बाजार उघडल्यानंतरच उत्साहाचे वातावरण दिसून आले. गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग आणि युरोपीय बाजारातील मजबूत कल यामुळेही बाजारधारणा बळकट झाली. याशिवाय भू-राजकीय तणाव कमी झाल्याने जागतिक पातळीवर कच्च्या तेल्याच्या भावात घट झाली. परिणामी याचा देशी शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला.
बाजारात खरेदीच्या मा:याने बीएसईच्या 12 वर्गातील निर्देशांकांपैकी 1क् फायद्यात राहिल्या. तेल आणि गॅस, भांडवल वस्तू, ऊर्जा आणि धातू शेअर्सच्या नेतृत्वात तेजी नोंदली, तर दैनंदिन जीवनावश्यक वस्तू बनविणा:या निवडक एफएमसीजी आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफेखोरी झाल्याचे दिसून आले.
तीस शेअर्सवर आधारित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुरुवातीच्या कारभारात अल्प घसरणीसह उघडला आणि व्यवहारादरम्यान तो एकावेळी 26,413.11 अंकांच्या नव्या उंचीवर पोहोचला. तथापि, नंतर तो 287.73 अंक वा 1.1क् टक्क्यांच्या तेजीसह 26,39क्.96 अंकाच्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. यापूर्वी 26 जुलै रोजी सेन्सेक्सची 26,271.85 अंक ही विक्रमी पातळी होती.
गेल्या पाच व्यापारी सत्रंत सेन्सेक्स 1क्61.82 अंक वा 4.19 टक्क्यांनी उंचावला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा 5क् शेअर्सचा निफ्टीही 82.55 अंक वा 1.क्6 टक्क्याच्या उसळीसह 7,874.25 अंक या नव्या उंचीवर बंद झाला. यापूर्वी निफ्टी 24 जुलै रोजी विक्रमी 7,83क्.6क् अंकावर बंद झाला होता.
बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ शोध विश्लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकारात्मक भाषणानंतर बाजाराला बळकटी आली. त्यांनी आपल्या भाषणात उत्तम कामकाज आणि पायाभूत सुविधा व उत्पादन क्षेत्रच्या सुधारणोवर भर दिला होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्मिती झाली. सेन्सेक्सवरील 3क् पैकी 24 कंपन्यांना तेजीचा लाभ झाला, तर पाचला नुकसान पोहोचले. विप्रोचे भाव स्थिर राहिले.
ओएनजीसी, सिप्ला, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, भारतीय स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रमुख कंपन्यांना तेजीचा लाभ झाला. दुसरीकडे आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी, टीसीएस आणि हीरो मोटोकार्पच्या शेअरमध्ये घट नोंदली गेली. (प्रतिनिधी)
 
4रशियातील राजकीय तणावामुळे तेथील गुंतवणुकीचा ओघ भारतीय बाजाराकडे वळला आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार रशियातूृन काढलेला पैसा भारतीय बाजाराकडे वळवीत असल्याने भारतीय शेअर बाजारात उत्साहाच्या भरतीला उधाण आले आहे, असे डेस्टीमनी सिक्युरिटीजचे अध्यक्ष सुदीप बंदोपाध्याय यांनी सांगितले. 
 
4युक्रेनमधील लष्करी संघर्षावरून उद्भवलेली कोंडी सोडविण्यासाठी रविवारी रशिया, जर्मनी, फ्रान्स आणि युक्रेनदरम्यान बर्लिन येथे वाटाघाटी पार पडल्या. सर्वसंबंधितांनी वाटाघाटी सुरू ठेवण्याचे मान्य केले असले तरी रशिया पाश्चिमात्य देशांविरुद्धचे र्निबध आणखी कठोर करण्याची शक्यता आहे. एकूणच ही कोंडी आणि रशियातील राजकीय तणाव भारताच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
 
4आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात झालेली घसरणही भारतीय शेअर बाजाराला उभारी देणारी ठरली. लिबियाने सोमवारी उत्पादन वाढविल्याने ब्रेन्ट क्रूड ऑईलचा भाव प्रति  बॅरल 1क्3 डॉलरच्या खाली आला. लिबियाच्या या निर्णयामुळे पुरवठय़ाबाबतची चिंता काही अंशी ओसरली. इराकमधील अराजकतेच्या पाश्र्वभूमीवर  इतर देशांनी उत्खननासोबत पुरवठा वाढविण्याचे ठरविल्याने परिस्थिती निवळत आहे, असे फिलीप फ्युचर्सचे अवतार संधू यांनी सांगितले.
 
4आशियाई शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. युरोपियन बाजार तेजीसह उघडला.
4आशियाई बाजारात चीन आणि जपान फायद्यात राहिले, तर सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजाराला फटका बसला. जपानचा निक्की स्थिर राहिला.
 
4विदेशी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त खरेदी केल्याने भारतीय शेअर बाजाराने विक्रमी पल्ला गाठला आहे. 
 
4राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्टेंबरअखेर 85क्क् आणि डिसेंबरअखेर 92क्क् चा पल्ला गाठेल, असा जाणकारांचा ठाम अंदाज आहे. त्यामागची तीन कारणो अशी..

 

Web Title: Sensex, Nifty at record levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.