Join us  

सेन्सेक्स, निफ्टी पोहोचले नव्या उच्चांकांवर;आगेकूच सुरूच, जागतिक तेजीचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:24 AM

आगेकूच सुरूच, जागतिक तेजीचा प्रभाव

मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली तेजी आणि परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने सुरू असलेली खरेदी यामुळे मुंबई शेअर बाजारातील तेजी सलग आठव्या सत्रामध्ये कायम राहिली. दिवसभरामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांक गाठले आहेत. मुंबई शेअर बाजारात बुधवारी व्यवहारांना तेजीनेच प्रारंभ झाला. दिवसभरामध्ये बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ४३,७०८.४७ अशी अत्युच्च पातळी गाठतानाच नवीन विक्रमाची नोंद केली. दिवसअखेर ३१६.०२ अंशांची वाढ नोंदवित हा निर्देशांक ४३,५९३.६७ अंशांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १२,७६९.७५ असा नवीन उच्चांक गाठून दिवसअखेर काहीसा खाली आला. बाजार बंद होताना निफ्टी १२,७४९.१५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ११८.०५ अंशांची वाढ झाली. काही समभागांमध्ये नफा कमाविण्यासाठी झालेली विक्री तसेच काही क्षेत्रांमध्ये असलेल्या तेजीने बाजारामध्ये थोडी अस्थरता दिसून आली असली तरी बाजारावर तेजीचीच पकड दिसून येत आहे.  परकीय वित्तसंस्थांकडून गेल्या काही दिवसांपासून मोठी खरेदी केली जात आहे. काल या संस्थांकडून ५६२७.३२ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार