पतधोरणापूर्वी सेन्सेक्स, निफ्टीची उसळी
By Admin | Updated: August 5, 2014 01:32 IST2014-08-05T01:32:26+5:302014-08-05T01:32:26+5:30
रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी व्याजदरांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या शेअर बाजारात सोमवारी तेजी नोंदली. शेअर बाजाराने जवळपास दोन आठवडय़ांची उच्चंकी पातळी गाठली.

पतधोरणापूर्वी सेन्सेक्स, निफ्टीची उसळी
मुंबई : रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी व्याजदरांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या शेअर बाजारात सोमवारी तेजी नोंदली. शेअर बाजाराने जवळपास दोन आठवडय़ांची उच्चंकी पातळी गाठली. सेन्सेक्सने 242 अंक आणि निफ्टीने 81 अंकांची उसळी घेतली. रुपया कमजोर झाल्याने आयटी कंपन्यांचे शेअर मजबूत राहिले.
मुंबई शेअर बाजाराचा 3क् कंपन्यांचा सेन्सेक्स सकाळी धडाक्यात उघडला. दिवसभराच्या व्यवहारात 25,754.42 आणि 25,531.38 अंकांच्या कक्षेत राहिल्यानंतर अखेरीस 242.32 अंकांची ङोप घेत 25,723.16 अंकांवर बंद झाला. यापूर्वी 22 जुलै रोजी सेन्सेक्स 31क्.63 अंकांनी मजबूत झाला होता.उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दोन सत्रंत सेन्सेक्समध्ये 6क्6.58 अंकाची घट नोंदली गेली होती.व्याजदराच्या दृष्टीने संवेदनशील एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्याची तेजी नोंदली गेली. ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, बांधकाम कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी राहिली.मागणीच्या पाठबळाने इन्फोसिस, हिंदाल्को, सेसा स्टरलाईट, मारुती, भेल, बजाज ऑटो, एल अँड टी, आयटीसी, टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक आणि ओएनजीसी यांचे शेअर्स लाभासह बंद झाले. श्रेणीबद्ध निर्देशांकाच्या दृष्टीने बीएसई ग्राहकोपयोगी इंडेक्सने सर्वाधिक 3.2क् टक्के, तर आयटी श्रेणीच्या इंडेक्सने 2.क्8 टक्क्यांची तेजी नोंदली गेली. (प्रतिनिधी)
च्राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 81.क्5 अंकांनी उंचावून 7,683.65 अंकांवर बंद झाला. गेल्या दोन सत्रंत यात 189 अंकांची कपात झाली. यापूर्वी 22 जुलै रोजी निफ्टी 83.65 अंकांनी बळकट झाला होता.
च्रिझव्र्ह बँक आज, मंगळवारी आपले तिसरे द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. ब्रोकर्सच्या मते, मध्यवर्ती बँकेकडून बाजारात तेजीसाठी काहीसा दिलासा मिळेल; मात्र रिझव्र्ह बँक आपल्या प्रमुख व्याजदरात कपात करण्याची शक्यता नसल्याचे सर्वसाधारण मत आहे.