सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उंचीवर

By Admin | Updated: November 28, 2014 23:47 IST2014-11-28T23:47:51+5:302014-11-28T23:47:51+5:30

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिस्थितीत व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली आहे.

Sensex, Nifty again on new heights | सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उंचीवर

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या उंचीवर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक परिस्थितीत व्याजदर कपात होण्याची शक्यता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून शुक्रवारी शेअर बाजार नव्या उच्चंकावर पोहोचले. 255.08 अंकांनी वाढलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 28,693.99 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी 94.05 अंकांनी वाढून 8,588.25 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांची ही सार्वकालिक उंची आहे. 
ब्रेंट क्रूड ऑईलचे जानेवारीसाठीचे सौदे 72 डॉलर प्रतिबॅरल झाले. तेलाच्या भावातील 2010 नंतरची ही नीचांकी पातळी आहे. कच्च तेलाच्या किमतीतील घसरण भारतासाठी चांगली बातमी आहे. एकूण वापरापैकी 80 टक्के तेल भारताला आयात करावे लागते. तेलाच्या किमती घसरल्याने भारताच्या चालू खात्यातील तूट भरून निघण्यास मदत होणार आहे. 
खनिज तेलाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये या बातमीने जोरदार उसळली पाहायला मिळाली. तेल कंपन्या, विमान कंपन्या, रंग बनविणा:या कंपन्या यांचे शेअर्स भराभर वर चढले. व्याजदरात कपात होण्याच्या शक्यतेने बँकिंग, ऑटोमोबाईल आणि रिअल्टी या क्षेत्रतील कंपन्यांना लाभ झाला. 2 डिसेंबरला रिझव्र्ह बँक पतधोरणाचा आढावा जाहीर करणार आहे. त्यात व्याजदर कपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला. लवकरच तो 28,822.37 अंकांवर पोहोचला. ही त्याची आजर्पयतची सर्वोच्च स्पर्श पातळी ठरली. युरोपीय बाजारातील कमजोरीचा नंतर सेन्सेक्सवर परिणाम झाला. तो थोडासा खाली आला. सत्रअखेरीस 255.08 अंक अथवा 0.90 टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 28,693.99 अंकांवर बंद झाला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने 355 अंकांची कमाई केली आहे. 
50 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी 94.05 अंकांनी अथवा 1.11 टक्क्यांनी वाढून 8,588.25 अंकांवर बंद झाला. एका क्षणी तो 8,617 अंकांर्पयत पोहोचला होता. नंतर तो थोडा खाली येऊन बंद झाला. 
ब्रोकर्सनी सांगितले की, तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना ओपेकने तेल उत्पादन कपात न करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यत: बाजारात तेजीला उधाण आले आहे. ओपेकच्या निर्णयानंतर रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. 
भारतीय शेअर बाजाराचे एकूण गुंतवणूक मूल्य शुक्रवारी 100 लाख कोटींच्या वर पोहोचले होते. सत्र अखेरीस ते 99,815.50 कोटींवर स्थिर झाले. काल ते 87,550 कोटी होते. 
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी काल 389.73 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 
आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन, जपान, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार वाढले. हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया येथील बाजार मात्र घसरले. 
युरोपीय बाजारात  सकाळच्या सत्रत घसरणीचा कल होता. सीएसी 0.38 टक्क्यांनी, डीएक्स 0.35 टक्क्यांनी, तर एफटीएसई 0.64 टक्क्यांनी खाली चालले होते. 
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 कंपन्यांपैकी 19 कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. 11 कंपन्यांचे शेअर्स घसरणीला लागलेले होते. 
(प्रतिनिधी)
 
च्तेजीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत अॅक्सिस बँक, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एमअँडएम, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया, एलअँडटी, हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी यांचा समावेश आहे. 
च्घसरणीचा सामना करावा लागलेल्या कंपन्यांत सेसा स्टरलाईट, भारती एअरटेल आणि ओएनजीसी यांचा समावेश होता. 
च्स्मॉलकॅप समभागांना नरमाईचा सामना करावा लागला. परिणामी सेन्सेक्स वाढूनही बाजाराचा एकूण व्याप जवळपास स्थिर राहिला. 1,509 कंपन्या तेजीत होत्या. 1,518 कंपन्यांना घसरण सोसावी लागली. बाजाराची एकूण उलाढाल 3,834.96 कोटी राहिली. काल ती 3,361.02 कोटी होती. 

 

Web Title: Sensex, Nifty again on new heights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.