सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चंक

By Admin | Updated: July 24, 2014 00:48 IST2014-07-24T00:48:49+5:302014-07-24T00:48:49+5:30

सलग सातव्या व्यावसायिक सत्रत तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी 121 अंकांनी वर चढून 26,147.33 अंकांच्या नव्या उच्चंकावर बंद झाला.

Sensex, High Nifty | सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चंक

सेन्सेक्स, निफ्टीचा उच्चंक

मुंबई : सलग सातव्या व्यावसायिक सत्रत तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी 121 अंकांनी वर चढून 26,147.33 अंकांच्या नव्या उच्चंकावर बंद झाला. सप्टेंबर 2012 नंतर सर्वात दीर्घ तेजीची नोंदही या निमित्ताने झाली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीनेही नवा विक्रम केला असून 27.90 अंकांच्या वाढीसह 7,795.75 अंकांचा बंद दिला आहे.
50 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या निफ्टीमधील आजची वाढ 0.36 टक्क्याची ठरली. या आधीचा निफ्टीचा बंदचा विक्रम 7 जुलै रोजी झाला होता. त्या दिवशी निफ्टी 7,787.15 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीने आज इंट्रा-डे उच्चंकही नोंदविला. एका क्षणी तो 7,809.20 अंकांवर पोहोचला होता. या आधी 8 जुलै रोजी 7,808.85 अंकांचा इंट्रा-डे विक्रम होता. 
भारतीय कंपन्यांसाठी जगातील सर्वात मोठी आऊसोर्सिग बाजारपेठ असलेल्या अमेरिकेची आर्थिक आकडेवारी सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आयटी क्षेत्रतील कंपन्यांनी आज मोठी ङोप घेतली. मोठय़ा आयटी कंपन्यांनी उत्तम कामगिरी केल्याचा लाभ 30 कंपन्यांवर आधारित सेन्सेक्सला झाला. 
सकाळी बाजार उघडला तोच तेजीने. 30 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सुरुवात तेजीने झाली. एका क्षणी सेन्सेक्स 190 अंकांची वाढ दर्शवीत होता. नंतर थोडीशी घसरण होऊन सेन्सेक्स 121.53 अंकांच्या अथवा 0.47 टक्क्याच्या वाढीसह 26,147.33 अंकांवर बंद झाला. या आधी 7 जुलै रोजी सेन्सेक्स 26,100.08 अंकांवर बंद झाला होता. हा विक्रम सेन्सेक्सने मोडीत काढला. 8 जुलै रोजीचा 26,190.44 अंकांचा इंट्रा-डे सार्वकालिक विक्रम मोडण्यात मात्र सेन्सेक्सला अपयश आले. आजचा सेन्सेक्सचा इंट्रा-डे उच्चंक 26,188.64 अंकांचा होता. 
गेल्या 7 व्यावसायिक सत्रंत सेन्सेक्सने 1,140.35 अंकांची कमाई केली. ही वाढ 4.56 टक्के आहे. सप्टेंबर 2012 नंतरची सर्वाधिक दिवस तेजीचा विक्रम सेन्सेक्सने केला आहे. 
आशियाई बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. चीन, हाँगकाँग, सिंगापूर आणि तैवान येथील बाजार तेजीसह बंद झाले. जपान आणि दक्षिण कोरियातील बाजार मात्र अल्प प्रमाणात कोसळले. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रत चांगले व्यवहार होताना दिसून आले. फ्रान्सचा सीएससी 0.42 टक्क्याने, जर्मनीचा डॅक्स 0.36 टक्क्याने, तर ब्रिटनचा एफटीएसई 0.19 टक्क्याने तेजीत होता.  मुंबई शेअर बाजारातील 30 पैकी 17 कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. 13 कंपन्यांचे शेअर्स मात्र कोसळले. (प्रतिनिधी)
 
4ब्ल्यूचिप कंपन्यांत तेजीचा माहोल असताना दुस:या दर्जाच्या कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे सेन्सेक्स वर चढलेला दिसत असला तरी बाजाराच्या एकूण भांडवलात मात्र नकारात्मकता दिसून आली. 1,649 कंपन्यांचे शेअर्स कोसळले. 1,318 कंपन्यांचे शेअर्स वाढले; तर 98 कंपन्यांचे शेअर्स स्थिर राहिले. बाजाराची एकूण उलाढाल थोडीशी घटून 3,029.20 कोटी झाली. काल ती 3,029.89 कोटी रुपये होती.
 
4भारताची दुस:या क्रमांकाची मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या शेअर्सने सर्वोत्तम कामगिरी केली. कंपनीचा शेअर 3.46 अंकांनी वाढला. सेन्सेक्सच्या वाढीत इन्फोसिसचा 60 अंकांचा वाटा राहिला. 
4तेजीचा फायदा होऊन टीसीएसच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन 5 लाख कोटी रुपये झाले. कंपनीच्या भांडवली मूल्यांकनात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. विप्रोच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. 
 
4बँकिंग क्षेत्रतीचा आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयला सर्वाधिक फायदा झाला. 
4ब्रोकरांनी सांगितले की, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयआय) काल 412.03 कोटी रुपयांची खरेदी केली. त्यामुळे बाजारातील भांडवली आवक वाढून मजबुतीचा कल निर्माण झाला आहे. 

 

Web Title: Sensex, High Nifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.