सेन्सेक्स 324 अंकांनी कोसळला
By Admin | Updated: September 17, 2014 02:52 IST2014-09-17T02:52:58+5:302014-09-17T02:52:58+5:30
लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपासाठी आलेल्या धक्कादायक निकालानेही गुंतवणूकदारांच्या धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.

सेन्सेक्स 324 अंकांनी कोसळला
मुंबई : अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या पतआढावा बैठकीपूर्वीच जागतिक बाजाराकडून नकारात्मक संकेत मिळाल्याने आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 324 अंक आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1क्9 अंकांनी आपटला. सेन्सेक्स व निफ्टी यात सात आठवडय़ांतील सर्वात मोठी घसरण नोंदली गेली.
आशियातील अधिकतर बाजारात घसरणीचा कल होता. तिकडे युरोपीय बाजारही घसरणीसह उघडला. ब्रोकर्सनी सांगितले की, लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपासाठी आलेल्या धक्कादायक निकालानेही गुंतवणूकदारांच्या धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.
मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअर्सचा सेन्सेक्स 26,854.9क् अंकांवर सुधारणोसह उघडल्यानंतर 26,861.29 अंकार्पयत ङोपावला. मात्र, नंतर मोठय़ा कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याने दिवसाची नीचांकी पातळी 26,464.क्3 अंकार्पयत घसरला. अखेरीस 324.क्5 अंक वा 1.21 टक्क्यांच्या आपटीसह 26,492.5 अंकावर बंद झाला.
1 ऑगस्टनंतर सेन्सेक्समध्ये एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. त्या दिवशी सेन्सेक्स 414.13 अंकांनी कोसळला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1क्9.1क् अंक वा 1.36 टक्क्यांच्या आपटीसह 7,932.9क् अंकावर बंद झाला. दिवसभरात तो 7,925.15 ते 8,क्44.9क् अंकादरम्यान राहिला. निफ्टीमध्ये 1 ऑगस्टनंतर आज सर्वात मोठी घसरण नोंदली गेली. त्या दिवशी निफ्टी 118.7क् अंकांनी खाली आला होता.
उल्लेखनीय म्हणजे, स्मॉल व मिडीयम कॅपमध्येही प्रत्येकी 3 टक्क्यांनी घसरण नोंदली गेली आहे.
सेन्सेक्सच्या 3क् पैकी 23 शेअरमध्ये घट झाली. डॉ. रेड्डीज, आयटीसी, इन्फोसिस, एअरसेल, हिंदुस्तान युनीलिव्हर, सनफार्मा व महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर तेजीत राहिले. तिकडे टाटा पॉवर, टाटा स्टील, हिंदाल्को, एनटीपीसी, टाटा मोटर्स, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, गेल यांचे शेअर्स घसरले.
4एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, गुंतवणूकदारांचे आठ वर्षाहून अधिक काळानंतर अमेरिकेत प्रथमच होणा:या व्याजदर वाढीकडे लक्ष आहे.
4 फेडरल रिझव्र्ह पुढील वर्षी व्याजदरात वाढ करेल, यावर सर्वाची सहमती झाली आहे. मात्र, याच्या वेळेबद्दल फेडद्वारे या बैठकीनंतर घोषणा केली जाणार आहे.
4हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईर्पयत इंधन दरांमध्ये फेरफार केली जाणार नसल्याची चर्चा आहे. यामुळे आयओसी, एचपीसीएल व बीपीसीएल यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आशियाई बाजारात सिंगापूर, तैवान, जपान, हाँगकाँग व चीनमध्ये क्.35 ते 1.82 टक्क्यांनी कोसळले. दुसरीकडे दक्षिण कोरियाई बाजार तेजीत राहिला.