सेन्सेक्स 29 अंकांनी घसरला
By Admin | Updated: September 30, 2014 01:30 IST2014-09-30T01:30:24+5:302014-09-30T01:30:24+5:30
रिझव्र्ह बँकेच्या उद्या होणा:या पतधोरण आढाव्याच्या पाश्र्वभूमीवर आज शेअर बाजारात सावध वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 29 अंकांनी घसरला.

सेन्सेक्स 29 अंकांनी घसरला
>मुंबई : रिझव्र्ह बँकेच्या उद्या होणा:या पतधोरण आढाव्याच्या पाश्र्वभूमीवर आज शेअर बाजारात सावध वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 29 अंकांनी घसरला.
ब्रोकरांनी सांगितले की, नफा वसुली आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची नरमाई यामुळे बाजारधारणोवर परिणाम झाला. सकाळी बाजार उघडला तेव्हा तेजीचे वातावरण होते. सेन्सेक्स वरच्या पातळीवर उघडला होता. एका क्षणी तो 26,715.77 अंकांर्पयत वर चढला होता; मात्र नंतर काही मोजक्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफा वसुलीचे सत्र सुरू झाल्याने बाजार घसरत गेला. दिवसअखेरीस 29.21 अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स 26,597.11 अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनक्स निफ्टी 9.95 अंकांनी घसरला. 7,958.90 अंकांवर तो बंद झाला. एसअँडपीने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केल्यानंतर शुक्रवारी शेअर बाजारांनी उसळी घेतली होती. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 157.96 अंकांनी वर चढला होता. या पाश्र्वभूमीवर शेअर बाजाराच्या आजच्या चालीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष होते; मात्र बाजाराने निराशाच केली. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. 9 कंपन्यांचे शेअर्स वाढले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यामुळे आयटी कंपन्यांना लाभ मिळाला. टीसीएसचे शेअर्स 3.17 टक्क्यांनी, विप्रो 1.18 टक्के आणि इन्फोसिस 1.90 टक्क्यांनी वाढले.
आयटीसी, आयसीआयसीआय बँॅक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, ओएनजीसी, सेसा स्टरलाईट, टाटा स्टील, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प आणि कोल इंडिया यांचे शेअर्स कोसळले. चीन आणि जपान वगळता इतर आशियाई बाजारांत आज मंदीचा कल दिसून आला. युरोपीय बाजारात सकाळच्या सत्रत नरमाईचे वातारण दिसून आले.
क्षेत्रवार निर्देशांकांपैकी धातू क्षेत्रचा निर्देशांक 1.11 टक्के कोसळला. एफएमसीजी 0.92 टक्के, बँकेक्स 0.91 टक्के आणि ऑटो निर्देशांक 0.44 टक्के कोसळला. आरोग्य क्षेत्रचा निर्देशांक मात्र 2.21 टक्क्यांनी वर चढला. आयटी 1.81 टक्के, टिकाऊ ग्राहक वस्तू 1.79 टक्के आणि टेक निर्देशांक 1.50 टक्के वर चढला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स घसरला असला तरी दुस:या फळीतील कंपन्यांच्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे बाजाराची एकूण कामगिरी सकारात्मक राहिली. 1,855 कंपन्यांना लाभ मिळाला, तर 1,087 कंपन्या तोटय़ात राहिल्या. बीएसईमधील स्मॉलकॅप आणि मीडकॅप निर्देशांक अनुक्रमे 1.49 टक्के आणि 1.01 टक्के वाढले.