सेन्सेक्समध्ये घसरण कायम
By Admin | Updated: June 29, 2017 00:28 IST2017-06-29T00:28:11+5:302017-06-29T00:28:11+5:30
शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी १२४ अंकांनी घसरून ३०,८३४.३२ वर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये घसरण कायम
मुंबई : शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी १२४ अंकांनी घसरून ३०,८३४.३२ वर बंद झाला. बँकांचे अनुत्पादित कर्ज (एनपीए) आणि वस्तू व सेवा कराबाबतची (जीएसटी) अनिश्चितता याचा बाजारावर परिणाम दिसून आला.
सेन्सेक्स आज १२३.९३ अंक घसरून ३०,८३४.३२ अंकांवर बंद झाला. गत दोन सत्रांत सेन्सेक्समध्ये ३३२.४९ अंकांची घसरण झाली होती. एनएसई निफ्टीमध्ये २०.१५ अंक घसरण होऊन तो ९,४९१.२५ अंकांवर बंद झाला.