ज्येष्ठ नाट्य समीक्षक राजा कारळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:55 IST2018-02-08T04:55:47+5:302018-02-08T04:55:52+5:30

ज्येष्ठ नाट्य समीक्षक राजा कारळे यांचे बुधवारी ठाणे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ९५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी व शिरीष, प्रवीण, मिलिंद हे मुलगे, अनुपमा ही मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

Senior play critic Raja Karele passes away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक राजा कारळे यांचे निधन

ज्येष्ठ नाट्य समीक्षक राजा कारळे यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक राजा कारळे यांचे बुधवारी ठाणे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ९५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी व शिरीष, प्रवीण, मिलिंद हे मुलगे, अनुपमा ही मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. कारळे यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजा कारळे यांनी ‘लोकमत’सह विविध वृत्तपत्रात अनेक वर्षे नाट्यसमीक्षा केली होती. लिटिल थिएटरच्या प्रणेत्या सुधा करमरकर यांच्यासमवेत त्यांनी बालरंगभूमीवर मोठे योगदान दिले होते.

Web Title: Senior play critic Raja Karele passes away