Senior music director Khayyam donated 10 crores of wealth | ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांनी 10 कोटींची संपत्ती केली दान
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांनी 10 कोटींची संपत्ती केली दान
ऑनलाइन लोकमत -
 
मुंबई, दि. 18 - ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांनी आपल्या 90व्या वाढदिवसानिमित्त 'खय्याम जगजीत कौर चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना केली आहे. महत्वाचं म्हणजे खय्यामजी यांनी आपली 10 कोटींची संपत्ती या ट्रस्टला दान केली आहे.
 
इंडिया टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार खय्याम यांनी आपली सर्व 10 कोटींची संपत्ती ट्रस्टला दान केली आहे. या पैशातून गरजू कलाकार, तंत्रज्ञांना मदत केली जाणार आहे. खय्यामजींच्या वाढदिवशी ही घोषणा करण्यात आली. 
 
बॉलिवूडमधल्या आपल्या 4 दशकांच्या करिअरमध्ये खय्यामजींनी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. ज्यामध्ये कभी कभी, उमराव जान, बाजार सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. उमराव जानमधील संगीतासाठी त्यांना नॅशनल पुरस्कारदेखील मिळाला आहे.
 
खय्यामजी यांना आपल्या कारकिर्दीत 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. तर 2011मध्ये पद्मभुषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 
 

Web Title: Senior music director Khayyam donated 10 crores of wealth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.