Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ आयपीएस अधिकारी व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 18:59 IST

वरिष्ठ आयपीएस अधिकारी व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण (५२) यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पोलीस महासंचालकांकडे गुरुवारी अर्ज केला आहे.

- मनीषा म्हात्रे

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण (५२) यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पोलीस महासंचालकांकडे गुरुवारी अर्ज केला आहे. ते सध्या राज्य पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन) म्हणून कार्यरत आहेत. व्ही.व्ही लक्ष्मीनारायण यांच्या अर्जामुळे पोलीस दलात विविध चर्चांना उधाण आलं आहे. 

लक्ष्मीनारायण यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. ते सन १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून नुकतीच राज्य प्रशासन विभागाची जबाबदारी काढ़ून घेण्यात आली होती असंही समजतं आहे. पोलीस महासंचालक सतीश माथुर हे पाच दिवसांच्या रजेवर आहेत. ते येताच त्यांच्या अर्जावर विचार होणार आहे.