Join us  

ज्येष्ठ नागरिकांना आता घरातच करणार क्वारंटाइन- पालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 4:59 AM

घरातूनच उपचारांचा फॉलोअप घेतला जाईल. स्थिती गंभीर असली व रुग्णालयात दाखल करण्याची गरज असली, तरच त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येईल.

मुंबई : कोरोनाची लक्षणे नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, मृत्यू होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी पालिका रुग्णालयातच कोरोनाची लक्षणे असलेल्या किंवा नसलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठांवर उपचार केले जातील, असे २१ आॅगस्टला पालिकेने जाहीर केले होते. मात्र, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये खाटा मिळत नाहीत, शिवाय पालिका आणि कोविड केंद्रांमध्ये उपचार करून घेण्यास कोरोनाची लक्षणे नसलेले बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक तयार होत नाहीत. यासाठी पालिकेने आपल्या निर्णयावरून यूटर्न घेत ज्येष्ठांना घरीच क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला. घरातूनच उपचारांचा फॉलोअप घेतला जाईल. स्थिती गंभीर असली व रुग्णालयात दाखल करण्याची गरज असली, तरच त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येईल.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस