ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक मोहन आपटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:44 AM2019-11-13T05:44:42+5:302019-11-13T05:44:48+5:30

ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक मोहन आपटे यांचे मंगळवारी मध्यरात्री विलेपार्ले येथील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले.

Senior astronomer Mohan Apte dies | ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक मोहन आपटे यांचे निधन

ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक मोहन आपटे यांचे निधन

Next

मुंबई : ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक मोहन आपटे यांचे मंगळवारी मध्यरात्री विलेपार्ले येथील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात वहिनी, पुतणी, जावई असा परिवार आहे.
मोहन अपाटे यांनी खगोलशास्त्र आणि विज्ञान या विषयक ७५ पुस्तके लिहिली आहेत. उत्तम संघटक, उत्तम वक्ता आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय होते. आपटे यांनी मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभाचे ते व्याख्याते होते. भवन्स विद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. मोहन आपटे हे संघाचे प्रचारक होते, तसेच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचेही काम पाहिले.
आपटे यांनी आपल्या सामाजिक जीवनात जनसेवा समिती संघटनेच्या माध्यमातून व्याखानमाला, वक्ता कार्यशाळा, गड-किल्ले भ्रमण-संरक्षण-संवर्धक असे उपक्रम राबविले. ‘मला उत्तर हवंय’ ही आपटे यांनी लिहिलेली पुस्तकांची मालिका बरीच गाजली. सर्व वैज्ञानिक घटनांची सहजसोप्या भाषेत उकल हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य होय. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यात मोहन आपटे यांचे मोठे योगदान आहे.

Web Title: Senior astronomer Mohan Apte dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.