अश्लील व्हिडीओ पाठविणा-याला अटक, अंधेरीत प्रकार आला उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:21 IST2017-10-27T02:21:16+5:302017-10-27T02:21:24+5:30

मुंबई : पंधरा वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवण्याचा प्रकार अंधेरीत उघड झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रांचच्या कक्ष १०ने गुरुवारी अटक केली.

The sending of pornographic videos came in the dark, the dark type came alive | अश्लील व्हिडीओ पाठविणा-याला अटक, अंधेरीत प्रकार आला उजेडात

अश्लील व्हिडीओ पाठविणा-याला अटक, अंधेरीत प्रकार आला उजेडात

मुंबई : पंधरा वर्षांच्या मुलीला अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवण्याचा प्रकार अंधेरीत उघड झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रांचच्या कक्ष १०ने गुरुवारी अटक केली.
हर्षकुमार जतीनकुमार तिवारी (२३) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. तिवारीने किरण (नावात बदल) या मुलीला इन्स्टाग्रामवर फ्रेण्डरिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर त्यांच्यात सतत चॅटिंग सुरू होती. याच दरम्यान त्याने किरणकडे शारीरिक सुखाची मागणी केली. नेमकी ही बाब तिच्या वडिलांनी पहिली. तेव्हा त्यांनी तिवारीला किरणशी संपर्क तोडण्यास बजावले. मात्र तरीदेखील तो तिला व्हिडीओ पाठवत होता. अखेर १८ आॅक्टोबरला किरणच्या पालकांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कक्ष १०च्या पथकाने चौकशी करत तिवारी हा गुजरातला राहत असल्याची माहिती मिळवली. त्यांचे एक पथक गुजरातला रवाना झाले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले. तिवारी हा गुजरातच्या एका व्यवसायिकाचा मुलगा आहे. जो पीडित मुलीसोबत एक खेळ खेळत होता. यात हारलेल्या व्यक्तीचे अश्लील फोटो सोशलसाईटवर अपलोड करावे लागतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: The sending of pornographic videos came in the dark, the dark type came alive

टॅग्स :Arrestअटक