सेना-भाजपात नव्याने सुंदोपसुंदी

By Admin | Updated: February 5, 2015 03:03 IST2015-02-05T03:03:22+5:302015-02-05T03:03:22+5:30

टॅबद्वारे शिक्षण देण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या योजनेला राज्यातील भाजपाप्रणीत सरकार फारसे अनुकूल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Sena-BJP prepares for better results | सेना-भाजपात नव्याने सुंदोपसुंदी

सेना-भाजपात नव्याने सुंदोपसुंदी

कलह : टॅबची योजना शिक्षण खात्याला जड
संदीप प्रधान - मुंबई
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याकरिता टॅबद्वारे शिक्षण देण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या योजनेला राज्यातील भाजपाप्रणीत सरकार फारसे अनुकूल नसल्याचे संकेत मिळत आहेत. दप्तराचे ओझे हा पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांशी निगडीत प्रश्न असून ओझे वाढण्याचे कारण खाऊचा डबा व वॉटरबॅग असल्याने विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना दप्तराच्या ओझ्याच्या संदर्भात गैरलागू असल्याचे मत भाजपाचे मंत्री विनोद तावडे यांच्या अखत्यारीतील शिक्षण विभागातील उच्चपदस्थांनी व्यक्त केले.
अलीकडेच शिवसेनेच्या टेलीमेडिसिन योजनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यात टॅबची योजना स्वीकारण्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून कामांची उद्घाटने करण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

टाकीच्या उद्घाटनाचा तणाव
च्घाटकोपर येथील पाण्याच्या टाकीची उभारणी करण्यात स्थानिक आमदार राम कदम यांचा वाटा असतानाही त्यांना व भाजपाचे मंत्री प्रकाश महेता यांना डावलून या कार्यक्रमाचे परिवहनमंत्री मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते शिवसेनेने उद्घाटन करण्याचे निश्चित केले होते. महापालिकेने लावलेल्या बॅनरवर भाजपाच्या नेत्यांचा उल्लेख नव्हता.
च्रावते यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले; मात्र या कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता व स्थानिक आमदार राम कदम यांना सन्मानाने बोलावण्यात आले नाही. हा कार्यक्रम उधळण्याचा इशारा कदम यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्यावर त्यांना बोलावण्यात आले.

टॅब योजना व दप्तराचे ओझे
सेनेची विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना स्वीकारली जाणे अशक्य असल्याचे शिक्षण खात्याकडून सूचित करण्यात आले. टॅबमध्ये अभ्यासक्रमाची योजना आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे. दप्तराचे ओझे हा पहिली ते पाचवी या इयत्तांतील विद्यार्थ्यांशी निगडीत मुद्दा आहे. टॅब योजना व दप्तराचे ओझे कमी करण्याचा अर्थाअर्थी संबंध नाही. उलटपक्षी माध्यान्ह भोजन देण्याची योजना असून डबे, पाण्याच्या बाटल्या आणणे टाळल्यास दप्तराचे वजन कमी होईल, असे विभागाला वाटते.

अधिकार नाहीत
भाजपाचे कॅबिनेट मंत्री सेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार प्रदान करीत नाहीत, या तक्रारीचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिण्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी निश्चित केले आहे.
-आणखी वृत्त/६

Web Title: Sena-BJP prepares for better results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.