नामांकित कंपनीचे टॅग लावून निकृष्ट जीन्सची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:09 IST2020-12-05T04:09:38+5:302020-12-05T04:09:38+5:30
दोघांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नामांकित कंपन्याचे टॅग निकृष्ट दर्जाच्या जीन्स पॅन्टसना लावणाऱ्या मालाडमधील कारखान्यावर गुरुवारी कुरार ...

नामांकित कंपनीचे टॅग लावून निकृष्ट जीन्सची विक्री
दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नामांकित कंपन्याचे टॅग निकृष्ट दर्जाच्या जीन्स पॅन्टसना लावणाऱ्या मालाडमधील कारखान्यावर गुरुवारी कुरार पोलिसांनी धाड टाकली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
इरसाद अहमद रेन (३२, रा. इंदिरानगर) आणि मोहम्मद चौधरी (३४, रा. दिंडाेशी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मालाड पूर्वच्या पठाणवाडी येथील पिंपलकर कम्पाउंडमध्ये ते कारखाना चालवतात. त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाचे कापड वापरत तयार केलेल्या जीन्स पॅन्टसना नामांकित कंपन्यांचे टॅग लावून त्यांची बाजारात विक्री केली जात होती.
लेवीस कंपनीच्या अधिकाऱ्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी तक्रार केली. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने कारखान्यावर धाड टाकून दोघांना अटक केली. कॉपी राईट कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, बोरीवली न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
................................................