बेचने वाले हवा भी बेचते है.. गुब्बारों में हवा डाल के !
By Admin | Updated: September 5, 2014 01:52 IST2014-09-05T01:52:03+5:302014-09-05T01:52:03+5:30
काल रात्रीपासून मला काहीच दिसेना. आरशातही चेहरा काळाच दिसतोय.

बेचने वाले हवा भी बेचते है.. गुब्बारों में हवा डाल के !
( ‘बॉलीवूड सेलिब्रेटीं’चा ‘व्हॉटस् अॅप’ ग्रुप.)
शक्ती : आऊùù ललिता. काल रात्रीपासून मला काहीच दिसेना. आरशातही चेहरा काळाच दिसतोय.
जॉनी : फिर कहीं तो ‘मूँह काला’ किया होगा.
रणबीर: मलाही सर्वत्र अंधारच दिसू लागलाय.
सलमान : अरे गांगलु. प्यार अंधा होता है. ‘कॅट’पासून दूर रहा, म्हणजे सारं काही स्पष्ट दिसेल.
अभिषेक : मी, विवेक किंवा रणबीर ‘ग्रुप’वर आलो की, लगेच ‘करपल्याचा वास’ येतो.
ऋतिक : प्लीज भांडू नकाùù माणसं तुटल्यानंतर कितीही कोटी मोजा; काहीच उपयोग नाही.
अजय : मी घरी टीव्हीवर मस्तपैकी ‘सिंघम’ बघत बसलो होतो.. तर तोही अचानक गायब झाला.
शाहरुख : थिएटरमधून ‘रिटर्न’ गुडूप झाला म्हटल्यावर हा टीव्हीवर थोडाच टिकणारंय?
राणी : ‘ग्रुप’वर ‘मर्दानी’ दाखवू नका. काल सर्वाच्या घरी अंधार का पडला, याचं उत्तर शोधा.
अनुपम : सूर्य मावळल्यानंतर अंधार पडणारच.
नाना : काल अतिश्रीमंत अन् उच्चभ्रू वसाहतीत जो अंधार पडला, त्याला ‘लोडशेडिंग’ म्हणतात.
आलिया : ‘लोडशेडिंग’ म्हणजे? लिपस्टिक -नेलपेंटची नवी शेड आलीय की काय बाजारात ?
अमीर : (‘सत्यमेव जयते’चं प्रॉम्टिंग आठवत) अपना देश ऊर्जा निर्मिती में पीछे है. दहा हजार चारशे नव्वानऊ गावांत मुलं पणतीसमोर अभ्यास करतात.
जया : आमची सत्ता असती तर असं झालं नसतं.
राखी : मग यंदा ‘लाल मिरची’ घेऊन उभे राहू.
सचिन : आयलाùù पण आम्ही अजून खासदार आहोत, हे विसरलोच होतो. रेखाजी, चला. उद्यापासून राज्यसभेत जाऊन ‘लोडशेडिंग’विरुद्ध आवाज उठवू.
जितेंद्र : सपोर्ट करायला जुहू बीचवर ‘कॅन्डल’ लावतो. ‘हिम्मतवाला’मधल्या मोठय़ा तबल्यांसारखं.
अमिताभ : त्या सीनच्या बॅकग्राऊंडला माझा आवाज देतो. आपलीच वीज आपल्यालाच विकतात. यहॉँ सब कुछ बिकता है, दोस्तों रहना जरा संभाल के! बेचनेवाले हवा भी बेच देते है, गुब्बारों में डाल के !!
(एवढय़ात लाईट आली. जुहू, वांद्रे अन् सांताक्रुझ परिसर उजळला. नेहमीप्रमाणो सारे आपापल्या कामाला. अन् ग्रुप पुन्हा सुनसान झाला.)
- सचिन जवळकोटे