सेल्फी काढून केली आत्महत्या..
By Admin | Updated: September 11, 2015 21:50 IST2015-09-11T21:50:44+5:302015-09-11T21:50:44+5:30
नालासोपारा येथे आज दुपारी धक्कादायक घटना घडली, पती आणी पत्नीच्या संशयवृतीच्या वादातून हा प्रकार घडला आहे.

सेल्फी काढून केली आत्महत्या..
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - नालासोपारा येथे आज दुपारी धक्कादायक घटना घडली, पती आणी पत्नीच्या संशयवृतीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. दोघामधील संवाद तुटल्याने एकमेकांपासून विभक्त राहणाऱ्या एका बेरोजगार 41 वर्षीय ज्युड मेस्करेनसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. सर्वात दुर्देवी गोष्ट म्हणजे आत्महत्येपूर्वी स्वत:चा सेल्फी काढून त्याने पत्नीच्या व्हॉटसअॅपवर पाठविला. त्याचवेळी फोटो पाहून तात्काळ पत्नीने नालासोपारा पोलिसात जाऊन, पोलिसासमवेत पतीचे घर गाठले. मात्र, तोप्रर्यंत उशीर झाला होता.
ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
ज्युड हा ग्रॅज्युशन पूर्ण करुन बेरोजगार होता. दोघांनी नालासोपाऱ्या फ्लॅटही घेतला होता. परंतु फ्लॅट कर्जावर घेतल्याने बॅंकेचे हप्ते भरण्यासाठी दोघांमध्ये वारंवार भाडंणे होत होती. पत्नी शिक्षिका असल्याने ती शाळेत नोकरी करुन खाजगी क्लासही घेत होती. मात्र, मृत ज्युड हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशयही घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, तर विभक्त राहण्याने ज्युड बावरा झाला होता आणि त्यातून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. असं पत्नीचं म्हणणं आहे.