गोवंडीत ७०० किलो मांस भरलेला टेम्पो जप्त
By Admin | Updated: July 5, 2017 04:41 IST2017-07-05T04:41:00+5:302017-07-05T04:41:00+5:30
सुमारे ७०० किलो मांसची संशयास्पद वाहतूक करणारा एक टेम्पो शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री गोवंडी येथे ताब्यात

गोवंडीत ७०० किलो मांस भरलेला टेम्पो जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुमारे ७०० किलो मांसची संशयास्पद वाहतूक करणारा एक टेम्पो शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री गोवंडी येथे ताब्यात घेतला आहे. या टेम्पोमधील मांस गोमांस असण्याची शक्यता व्यक्त करत त्याची तपासणी करण्यासाठी कलिना येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. सायन-पनवेल मार्गाने ही वाहतूक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. तरी याप्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलिसांनी चालकासह टेम्पो ताब्यात घेतला.