दुरवस्था बघून झाले नि:शब्द

By Admin | Updated: June 23, 2015 23:42 IST2015-06-23T23:42:12+5:302015-06-23T23:42:12+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा खिळखिळी होण्याला प्रशासनासह सत्ताधारी जबाबदार असून जिथे कर्मचाऱ्यांनाच सुविधा पुरविलेल्या नाहीत तिथे ते प्रवाशांना

Seeing the mood was mute | दुरवस्था बघून झाले नि:शब्द

दुरवस्था बघून झाले नि:शब्द

अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा खिळखिळी होण्याला प्रशासनासह सत्ताधारी जबाबदार असून जिथे कर्मचाऱ्यांनाच सुविधा पुरविलेल्या नाहीत तिथे ते प्रवाशांना काय देणार? कर्मचाऱ्यांना दिलेल्या केबीन गळक्या, प्यायच्या पाण्याचा अभाव, तुटकी अन् फाटकी आसन व्यवस्था अशी दयनिय अवस्था बघून त्यांना कसा जाब विचारणार? आधी त्यांच्या आरोग्यासह सुविधांचा प्रश्न मार्गी लावणे हे मोठे आव्हान असल्याचे भयाण वास्तव परिवहनचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांना बघायला मिळाले. मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी ‘लोकमत’च्या केडीएमटी बाबतच्या विविध वृत्ताची सत्यता पडताळण्यासह कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी डोंबिवलीतील ‘बाजीप्रभू चौकातील वाहनतळाला’ मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास सरप्राईज भेट दिली. त्यामध्ये त्यांना हे भयाण वास्तव दिसले. लोकमतचे वृत्त योग्य असून त्यापेक्षाही भयंकर स्थिती असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Seeing the mood was mute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.