Join us

सलमान सोबतच्या आगामी चित्रपटात पाहा जॅकलिन फर्नाडीसचे पोल डान्सचे कौशल्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 16:54 IST

बॉलिवूडची हॉट, मादक अभिनेत्री जॅकलिन फर्नाडीस पोल डान्समध्येही पारंगत आहे. तिच्या याच कौशल्याने प्रभावित होऊन रेस 3 च्या निर्मात्यांनी चित्रपटात पोल डान्सचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देजॅकलिन भरपूर मेहनती असून तिने अत्यंत कमी वेळात पोल डान्समधील बारकावे शिकून घेतले आहेत.हा डान्स शिकून घेण्यासाठी जॅकलिनने कठोर प्रशिक्षण घेतले आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूडची हॉट, मादक अभिनेत्री जॅकलिन फर्नाडीस पोल डान्समध्येही पारंगत आहे. तिच्या याच कौशल्याने प्रभावित होऊन रेस 3 च्या निर्मात्यांनी चित्रपटात पोल डान्सचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आतपर्यंत सोशल मीडियावर आपल्या पोल डान्स व्हिडिओ शेअर करणारी जॅकलिन चित्रपटात पोल डान्स करताना दिसणार आहे. 

जॅकलिन भरपूर मेहनती असून तिने अत्यंत कमी वेळात पोल डान्समधील बारकावे शिकून घेतले आहेत असे रेस 3 चित्रपटाचे दिग्दर्शक रेमो डिसूजा म्हणाले. जॅकलिनचे पोल डान्समधील कौशल्य आपण सर्वांनीच पाहिले आहे त्यामुळे आम्ही पोल डान्सला रेस 3 मध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला असे रेमो म्हणाले. 

हा डान्स शिकून घेण्यासाठी जॅकलिनने कठोर प्रशिक्षण घेतले आहे. रेस 3 मध्ये जॅकलिन पुन्हा एकदा सलमान सोबत दिसणार आहे. याआधी किक 2 मध्ये जॅकलिन सलमानची नायिका होती. 2018 मध्ये ईदला रेस 3 प्रदर्शित होणार आहे.