सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच!
By Admin | Updated: December 9, 2014 01:13 IST2014-12-09T01:13:11+5:302014-12-09T01:13:11+5:30
टॅक्सीचालकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा मेट्रोपोलिटन शहरांमधील तरुण मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच!
मुंबई : दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणाला दोन वर्षे उलटूनही राजधानीत अत्याचारांचे सत्र सुरूच आहे. रविवारी दिल्लीत एका टॅक्सीचालकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा मेट्रोपोलिटन शहरांमधील तरुण मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ‘निर्भया’ प्रकरणानंतरही शासनाने कोणतीच कृतिशील पावले न उचलल्याची खंत तरुण मुलींनी व्यक्त केली आहे. शिवाय, रात्रीचा प्रवास हा धोक्याचाच असल्याची भावनाही व्यक्त केली आहे, त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येईल का? हाच सवाल तरुणाईला सतावतोय..
शासनाचा दोष
तरुणी आणि महिलांवर होणा:या अत्याचारांचे प्रमाण वाढतेय, यावर किती दिवस फक्त बोलायचे, हेच कळत नाही. राज्यकर्ते ‘खुच्र्या’चा विचार सोडून या समस्यांचा विचार कधी गांभीर्याने करणार, याची वाटच पाहत बसायची का? एखादी घटना घडली की, मेणबत्ती हाती घेऊन मोर्चे काढून गप्प बसायचे. शासन मात्र ‘जैसे थे’ ..यावर आता तरुणाईने एकत्र येऊन ख:या अर्थाने आवाज उठविला पाहिजे. महिलांवर होणा:या अत्याचाराला शासनच जबाबदार आहे. गेल्या काही दिवसांत रिक्षा- टॅक्सीवाल्यांची दादागिरी वाढल्यामुळे अशा घटना वाढतायत.
- मुकुलिना कोलते, रहेजा महाविद्यालय
अजूनही असुरक्षित वाटते
वाढत्या अत्याचारांमुळे आजही मुंबईसारख्या शहरात वावरणो भीतीदायक वाटते. अशात निर्भया प्रकारानंतर पुन्हा झालेल्या बलात्काराच्या घटनेने तर भीतीत आणखीन भर पडली आहे. या घटना रोखणो गरजेचे आहे.
- आकांक्षा प्रवीण बनकर, पोद्दार महाविद्यालय
रात्री प्रवास करणो कठीणच
मुंबई असो वा दिल्ली सध्या कोणत्याच शहर आणि देशांत ‘स्त्री’कडे केवळ मादी म्हणूनच पाहिले जाते. एकविसाव्या शतकातही तरुणींचे स्वातंत्र्य हिरावणो, त्यांना प्रवास करणो धोक्याचे वाटणो लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचे आहे. मात्र या परिस्थितील केवळ कोणी एक जबाबदार नसून सर्व ‘सिस्टीम’ जबाबदार आहे. शिवाय, तरुणी आणि महिलांवर होणा:या अत्याचारांच्या घटनांमध्ये ब:याचदा ओळखीची माणसे हीच गुन्हेगाराच्या भूमिकेत असतात, त्यामुळे याचाही विचार करणो गरजेचे आहे.- अक्षया घाडी, रहेजा महाविद्यालय
दिल्लीची घटना निंदनीय
निर्भया प्रकरणाला दोन वर्षे उलटत नाहीत तोच दिल्लीत बलात्काराची दुसरी घटना समोर आली. ही घटना निंदनीय असून यावर रोख बसणो गरजेचे आहे. अशात मुंबईत वावरणो कठीण होत आहे.
- कीर्ती साठे, पशुवैद्यकीय महाविद्यालय
रिक्षा-टॅक्सीचा
प्रवास नकोसा
निर्भया घटनेनंतर घरच्यांनी खासगी बसेसमध्ये जाण्यास बंदी घातली होती. अशात या घटना रिक्षा-टॅक्सीमध्ये पण होत असल्याने मुबईमध्ये या वाहनांतून प्रवास करणो नकोसे वाटते. एक वेळ मित्र मैत्रिणीसोबत चालत जाणो पसंत करते.
- अश्विनी भोरे, विकास महाविद्यालय
रात्री घराबाहेर पडणो धोक्याचे
आजही रात्री-अपरात्री घराबाहेर पडणो भीतीचे वाटते. कुठल्या क्षणाला काय होणार याची भीती वाटते. मानवी विकृतीचे रोज एक उदाहरण ऐकण्यास, वाचण्यास मिळत आहे. त्यामुळे मनात एक भीती कायम आहे.
- संचिता बनकर, पोद्दार महाविद्यालय
सुरक्षिततेचा अभावच
मुंबईत सुरक्षित आहोत, पण अजूनही कुठेतरी पूर्णपणो सुरक्षित असल्यासारखे वाटत नाही. कितीही केले तर रात्री घराबाहेर पडणो नकोसे वाटते . मनात एक अनामिक भीती घर करून आहे. त्यामुळे रोजच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनाक्रमामुळे हे थांबणार कधी हा विचार सतावत असतो.
- स्मृती वेदक, विकास महाविद्यालय
भीती वाटतेच..
रात्री उशिरा प्रवास करताना बेस्ट बसचा पर्याय निवडल्यास सुरक्षित वाटते. पण त्याऐवजी टॅक्सीने जायचे असल्यास भीती वाटते. रात्री 11 नंतर रस्त्यावर एकटे उभे असल्यास टॅक्सीवाले आपल्या जवळ येऊन टॅक्सी स्लो करतात. अशावेळी त्यांचा हेतू चांगला असूही शकतो, पण तरी भीती वाढते. आपण टॅक्सी पकडताना टॅक्सीवाला एकटाच असतो, पण नंतर कोणी चढले तर आपण त्यातून सुटका कशी करून घेणार? हा प्रश्नच राहतो.
- नेहा कारेकर, गिरगाव
सेफ नाही..
रात्री उशिरा बोरीवली स्टेशनहून घरी जायचे असले तरी मी एकटी असताना रिक्षा करत नाही. रात्री साडेदहानंतर तर एकटे चालत जायलाही भीती वाटते, पण तरीही मी चालत जायला पसंती देते. कारण, एकदा रिक्षात बसल्यावर ओळखीचा रस्ता असूनही रात्री रिक्षावाल्याने दुस:या रस्त्याने रिक्षा काढली तर काय करणार? हीच भीती मनात आहे.
- नेहा सोहनी, साठे कॉलेज
साडेदहानंतर रिक्षा-टॅक्सी नकोच
साडेदहानंतर रस्त्यावर वर्दळ कमी होते. या वेळी रिक्षा-टॅक्सीतून एकटे जाणो भीतीदायक वाटते. रिक्षावाला, टॅक्सीवाला कसा असेल हे आपण सांगू शकत नाही. समजा काही बरे-वाईट झालेच तर कोणी मदतीला पटकन येईलच याची शाश्वती नाही. एकटे असताना आपण कितीही खबरदारी घेतली तरी त्या माणसाच्या ताकदीपुढे मुलीची ताकद कमी पडते.
- ऋता कोपरकर, ठाणो
सुरक्षितही.. असुरक्षितही..
मुंबईच्या दृष्टीने विचार केल्यास 5क् टक्के सुरक्षित वाटते. रात्री उशिरा म्हणजे 11 नंतर घरी जायचे असल्यास पटकन पोहोचण्यासाठी टॅक्सीचाच पर्याय असतो. पण तरीही टॅक्सी पकडल्यावर थोड टेन्शन असतेच. अनेक टॅक्सीवाले चांगलेही असतात. पण टॅक्सीवाला चांगला नसेल, त्याने टॅक्सी दुसरीकडे वळवली किंवा काही केले तर आपण काय करणार? विरोध केलातरी कितपत करू शकतो, हे प्रश्न सतावतात.
- नेहा भावे, माटुंगा
रात्री नऊनंतर प्रवास नकोच
वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे मुलींना घरातूनच बंधने घालण्यात येत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या व्यक्ती राजरोसपणो हे अत्याचार करतात, ते समाजात वावरू शकतात आणि मुलींनी मात्र मर्यादा पाळायच्या. गेल्या काही दिवासात रिक्षा, टॅक्सीचालकांवर विश्वास ठेवणो कठीण होत चाललेय.
- दुहिता फलके, विल्सन महाविद्यालय