एक हजार रुपयांसाठी सुरक्षा रक्षकाची हत्या
By Admin | Updated: December 4, 2015 01:51 IST2015-12-04T01:51:26+5:302015-12-04T01:51:26+5:30
एक हजार रुपयांसाठी उत्तम चनाप्पा कांबळे (४९) या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी हत्येच्या गुन्ह्यात आरोपी अर्जुन

एक हजार रुपयांसाठी सुरक्षा रक्षकाची हत्या
मुंबई : एक हजार रुपयांसाठी उत्तम चनाप्पा कांबळे (४९) या सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी हत्येच्या गुन्ह्यात आरोपी अर्जुन सखाराम ढेपे (६७) याला अटक करण्यात आली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील सिद्धार्थनगर परिसरात बांधकाम सुरू आहे. या बांधकाम साइटवर ठाणे येथील रहिवाशी असलेला कांबळे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने सहसुरक्षा रक्षक असलेल्या ढेपेकडून एक हजाराचे कर्ज घेतले होते. मात्र, ते परत करण्यास कांबळे टाळाटाळ करत होता. बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पैशावरून दोघांमध्ये वादावादी झाली. त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. ढेपेने बांधकाम साइटवर असलेल्या लोखंडी पाइपने उत्तमला मारले, त्यात त्याचा
जागीच मृत्यू झाला होता. घटनेची वर्दी मिळताच मुलुंड पोलीस
ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने पावणे बाराच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. कांबळे यांना अग्रवाल रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.