Join us  

मुंबईत दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट शक्य; टाटा इन्स्टिट्यूटचा इशारा

By हेमंत बावकर | Published: November 02, 2020 7:16 PM

CoronaVirus News : मुंबईला पुढील महिन्यात कोरोनाचा मोठा धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल, असे टाटा इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

ठळक मुद्देऑक्टोबर 26 च्या माहितीवरून टीआयएफआरच्या टीमने हा निष्कर्ष काढला आहे. शहरात कमी अधिक प्रमाणात 80 टक्के झोपडपट्टी आणि 55 टक्के अन्य रहिवाशांमध्ये हर्ड इम्युनिटी जानेवारी 2021 पर्यंत होण्याची शक्यता आहे.हा नवा अंदाज नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु करण्याच्या निर्णयाला विचारात घेवून व्यक्त करण्यात आला आहे.

देशात कोरोनाची सर्वात मोठी रुग्णांची आणि आर्थिक झळ बसलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीत कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा टाटा इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी दिला आहे. Tata Institute of Fundamental Research (TIFR) तज्ज्ञांनी यासाठी दिवाळीनंतरचा काळ धोक्याचा असल्याचे म्हटले आहे. 

मुंबईला पुढील महिन्यात कोरोनाचा मोठा धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल, असे टाटा इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. मात्र, जानेवारीपेक्षा नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तयारी असलेली हॉस्पिटल जास्त आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

ऑक्टोबर 26 च्या माहितीवरून टीआयएफआरच्या टीमने हा निष्कर्ष काढला आहे. शहरात कमी अधिक प्रमाणात 80 टक्के झोपडपट्टी आणि 55 टक्के अन्य रहिवाशांमध्ये हर्ड इम्युनिटी जानेवारी 2021 पर्यंत होण्याची शक्यता आहे. मुंबईतील तीन वॉर्डमध्ये कोरोनाने संक्रमित झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यावरून गणपतीनंतर जशी कोरोनावाढीची लाट आली तशीच दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे. ही लाट मागील लाटेपेक्षा छोटीही असू शकते, असे  TIFRचे प्राचार्य डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीमध्ये अधिकाधिक मुंबईकर कोरोनामुळे धोक्यात होते, यामुळे त्यांच्यात कमी अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. यामुळे ही लाट थोडीफार छोटी असेल, असे ते म्हणाले. 

 हा नवा अंदाज नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु करण्याच्या निर्णयाला विचारात घेवून व्यक्त करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये शाळा, कॉलेज सुरु झाल्यास हॉस्पिटलायझेशनमध्ये फारशी वाढ होणार नाही. परंतू जानेवारीपेक्षा नोव्ंहेबरमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर रुग्णांची संख्या जास्त असेल असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

हॉस्पिटलायझेशनमध्ये दिवसाला 2300 ते 3200 रुग्ण वाढ होऊ शकते. तर जानेवारीत हीच वाढ 200 ते 2000 असू शकते. १ नोव्हेंबरपासून काही गोष्टी खुल्या झाल्याने 20 ते 30 रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, तर जानेवारीत 4 ते 20 मृत्यू होऊ शकतात, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. टोपे म्हणाले काही तज्ज्ञ अशा प्रकारची शक्यता व्यक्त करत आहेत. अशा कुठल्याही लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. सरकारने तयार केलेला टास्क फोर्स याबाबात अभ्यास करत असल्याचंही त्यांनी सांगितले. गेल्या आठ महिन्यांतल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचा अनुभव आता सरकारकडे असून त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आरोग्य यंत्रणाही आता सक्षम झाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक