मुंबई विद्यापीठाच्या पदांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

By स्नेहा मोरे | Updated: October 20, 2023 19:18 IST2023-10-20T19:13:27+5:302023-10-20T19:18:47+5:30

मुंबई विद्यापीठामार्फत विविध पदे भरण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.

Second time extension for Mumbai University posts | मुंबई विद्यापीठाच्या पदांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

मुंबई विद्यापीठाच्या पदांसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ

मुंबई : विद्यापीठाच्या आस्थापनेवरील कुलसचिव, अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन, अधिष्ठाता मानव्यविद्याशाखा, अधिष्ठाता आंतरविद्याशाखीय अभ्यास, वित्त व लेखा अधिकारी, संचालक आजीवन अध्ययन व विस्तार आणि संचालक माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान विभाग या पदासाठी अर्ज करण्यास विद्यापीठाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, आता २६ ऑक्टोबरपर्यंत या पदांसाठी अर्ज करता येतील.

मुंबई विद्यापीठामार्फत विविध पदे भरण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर होती. विद्यापीठाने या पदांसाठी अर्ज करण्यास १६ ऑक्टोबरपर्यंत पहिली मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, २६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या जाहिरातीच्या मुदतवाढीसंबंधात इच्छुकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रभारी कुलसचिव प्रा. सुनील भिरुड यांनी केले आहे.
 

Web Title: Second time extension for Mumbai University posts