आयटीआय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:17 IST2020-12-04T04:17:27+5:302020-12-04T04:17:27+5:30
मुंबई : राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ...

आयटीआय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज
मुंबई : राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज, अर्जात दुरुस्ती ३० नोव्हेंबरपर्यंत करता येईल. गुरुवारी या प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
........................
एमबीबीएसची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
मुंबई : काेरोनाची पार्श्वभूमी व लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला. ऑनलाईन शिक्षणामुळे थेअरी व प्रॅक्टिकल होऊ शकले नाही. तरीही सरकारने एमबीबीएस परीक्षा ७ डिसेंबरपासून घेण्याचे घोषित केले आहे. परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली.
........