अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी १९ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 05:57 IST2018-07-17T05:57:32+5:302018-07-17T05:57:59+5:30
अल्पसंख्याक महाविद्यालयातील कोट्यावरून एफवाय प्रवेशाचा गोंधळ संपतो न संपतो, तोपर्यंत आता अकरावीच्या कोट्यासंदर्भातील जागांमुळे गुणवत्ता यादीत अडथळे निर्माण झाले आहेत.

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी १९ जुलैला
मुंबई : अल्पसंख्याक महाविद्यालयातील कोट्यावरून एफवाय प्रवेशाचा गोंधळ संपतो न संपतो, तोपर्यंत आता अकरावीच्या कोट्यासंदर्भातील जागांमुळे गुणवत्ता यादीत अडथळे निर्माण झाले आहेत. अकरावी प्रवेशाच्या अल्पसंख्याक महाविद्यालयांतील कोट्यातील जागांसंदर्भातील याचिका नागपूर खंडपीठात दाखल झाल्याने, आता अकरावी आॅनलाइन प्रवेशाची सोमवारी जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलली असून, आता ही यादी गुरुवारी जाहीर केली जाणार आहे. या संदर्भातील परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. यादी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल.