Join us

अकरावी प्रवेशाची दुसरी यादी आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 06:09 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पुढे ढकललेली दुसरी यादी आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पुढे ढकललेली दुसरी यादी आज (गुरुवारी) सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयातील कोट्यावरून नागपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ही यादी पुढे ढकलण्यात आली होती.पहिल्या यादीत मुंबई विभागातून १ लाख २० हजार ५६६ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते. अद्याप दीड लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. पहिल्या कट आॅफनेच ८६ ते ९३ टक्क्यांचा आकडा पार केला आहे. पहिल्या यादीत नव्वदहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिल्यामुळे ८० ते ७५ टक्के गुण मिळविलेले विद्यार्थी पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत असून, त्यांची ही प्रतीक्षा आज संपेल.