व्यावसायिक अभ्यासक्रमांची दुसरी कट आॅफ चढीच!
By Admin | Updated: June 19, 2015 02:51 IST2015-06-19T02:51:05+5:302015-06-19T02:51:05+5:30
पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी गुरूवारी जाहीर झाली. त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची

व्यावसायिक अभ्यासक्रमांची दुसरी कट आॅफ चढीच!
मुंबई : पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी यादी गुरूवारी जाहीर झाली. त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची यादी अद्याप नव्वदीवर अडकली असून पारंपरिक अभ्यासक्रमांची यादी मात्र खालावली आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत यंदाही विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. बीएफ आणि बीएमएफ अशा वेगळ््या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा ओढा दिसून आला. त्यामुळे नव्वद टक्के मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही नामांकित महाविद्यालयात या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळण्याची धूसर शक्यता आहे.
मुंबईतील काही महाविद्यालयांतील शाखानिहाय कट आॅफ लिस्ट
साठ्ये
कला - ३८.९३
विज्ञान - ५९.१६
वाणिज्य - ६४.१६
रु ईया कॉलेज
कला - ८८
विज्ञान - ७१.०८
बीएससी सीएस - ७४.४
बीएससी बायो अनलेटीकल - ६१
बीएमएम (इंग्रजी) -
कला - ८४.१७
वाणिज्य - ८७.६०
विज्ञान - ८६.४०
बीएमएम (मराठी)
वाणिज्य - ५०.३३
केळकर कॉलेज
विज्ञान - ६३.३८
वाणिज्य - ८६.७७
बीएससी आयटी (गणित) - ७६
बीएससी बायो टेक्नोलॉजी ७७.२३
बीबीआय - ८०
बॅफ - ८५.३८
बीएमएम -
कला - ७५.३८
विज्ञान - ७६.८०
बीएमएस
कला - ६१.५४
विज्ञान - ७२.७७
वाणिज्य - ८६.३१
पोदार
वाणिज्य - ९३.२३
बीएमएस -
कला - ७२.७६
वाणिज्य - ९३.४
विज्ञान - ८३.५४