Search results announced | शोधबोध स्पर्धेचा निकाल जाहीर

शोधबोध स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई : स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्रच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘कलाश्रम’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोधबोध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रवीण पिसे, आनंद साळवी, राजेंद्र घरत व प्रदीप कासुर्डे हे या स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने विजेते क्रमांक घोषित होणार आहेत. या स्पर्धेसाठी निरीक्षक व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी काम पाहिले. नाट्य समीक्षक व लेखक रमेश उदारे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Search results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.