बेपत्ता चिमुरडीचा शोध सुरूच

By Admin | Updated: April 30, 2017 03:21 IST2017-04-30T03:21:53+5:302017-04-30T03:21:53+5:30

घाटकोपर रेल्वे स्थानकातून पालकांसोबत घरी जात असताना अडीच वर्षांची चिमुरडी १५ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. आनंदी श्रावण पवार असे तिचे नाव असून अद्याप तिचा शोध लागलेला नाही.

The search for the missing chimera continued | बेपत्ता चिमुरडीचा शोध सुरूच

बेपत्ता चिमुरडीचा शोध सुरूच

मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकातून पालकांसोबत घरी जात असताना अडीच वर्षांची चिमुरडी १५ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. आनंदी श्रावण पवार असे तिचे नाव असून अद्याप तिचा शोध लागलेला नाही.
कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. आनंदीचा पोलीस सर्वत्र शोध घेत आहेत. तिच्याबाबात कुणाला काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The search for the missing chimera continued