Join us
Daily Top 2Weekly Top 5

युवराजांच्या भाषणाची स्क्रीप्टही कंत्राटदारांकडूनच आली का? आशिष शेलारांचा सवाल

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 1, 2023 21:25 IST

आमदार अँड आशिष शेलार  म्हटले की,उबाठा गटाच्या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी जे आज प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये  मुंबईकरांची काळजी कुठे होती?

मुंबई - ज्या भ्रष्टाचारी कंत्राटदारांना उबाठा गटाने २५ वर्षे  मुंबई महापालिकेत पोसले, लाड केले त्या कंत्राटदारांना आता कामं मिळत नाहीत म्हणून थयथयाट सुरू आहे. आज तर युवराजांच्या भाषणाची स्क्रिप्ट पण कंत्राटदारांकडून आली होती की काय? असा सवाल  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केला असून मोर्चाला नाव मुंबईकरांचे आणि चर्चा कंत्राटांची अशी, टीका केली आहे.

आमदार अँड आशिष शेलार  म्हटले की,उबाठा गटाच्या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी जे आज प्रश्न उपस्थित केले, त्यामध्ये  मुंबईकरांची काळजी कुठे होती? यालाच कंत्राट का? म्हणजे याचा अर्थ यांच्या कंत्राटदारांना का नाही? हा काय मुंबईकरांसाठी विचारलेला प्रश्न नव्हता. एवढे रस्ते कशाला? एवढी स्ट्रीट फर्निचरची खरेदी कशाला?  म्हणजे मुंबईकरांसाठी फर्निचर खरेदी केली ती यांच्या कंत्राटदारांकडून का नाही असेच ना? हे काही  मुंबईकरांचे प्रश्न नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

स्ट्रीट फनिर्चरच्या खरेदीची चर्चा करताय? मग ईडी मध्ये समोर आलाले युसूस फनिर्चरवाल्याच्या फ्लॅट मध्ये कोविड काळात देवाणघेवाणीचे व्यवहार झाल्याची जी माहिती उघड होते, यावर का बोलत नाहीत?असा सवाल त्यांनी केला. मुंबईच्या रस्त्यांची कामे आंतरराष्ट्रीय स्थरावर काम करणारे कंपन्या करतात, चांगल्या दर्जाचे रस्ते, वीस वर्षांची हमी घेऊन केली जात आहेत. रस्त्यांंची कामे करताना युटिलिटी डक तयार केले जात आहेत. याकडे दुर्लक्ष करून सगळी चर्चा कंत्राटदारांची आजच्या मोर्चात पहायला मिळाली अशी टिका त्यांनी केली.

कोविड काळात  मुंबईच्या बिल्डरांना ५० टक्के प्रिमियम मध्ये सूट देण्याची खैरात केलीत, त्यामुळे मुंबई महापालिकेचे १२ हजार कोटींचे नुकसान झाले , ताज हाँटेलला सुट दिलीत ही पालिकेच्या तिजोरीची लूट नाही का?असा सवाल शेलार यांनी केला. तुम्ही ढाळताय ते मगरीचे अश्रू आहेत हे मुंबईकर ओळखून आहेत. त्यामुळे आम्ही "चोर मचाज शोर" हे जे तुम्हाला म्हणतोय तेच मुंबईकरांना पटेल, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, आजच्या अपघाताच्या दु:खद घटनेमुळे भाजपाचा आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला तरी भाजपातर्फे शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेली होर्डिंग मात्र मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होती.

 

टॅग्स :आशीष शेलारमुंबईशिवसेना