मुंबईत खाते उघडण्याची शेकापची धडपड

By Admin | Updated: October 2, 2014 23:00 IST2014-10-02T23:00:20+5:302014-10-02T23:00:20+5:30

विधानसभेसाठी शेतकरी कामगार पक्षाने मुंबईतून अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र यामध्ये पक्षाला कधीही यश आलेले नाही.

The scope of the opening of the account in Mumbai | मुंबईत खाते उघडण्याची शेकापची धडपड

मुंबईत खाते उघडण्याची शेकापची धडपड

>मुंबई : विधानसभेसाठी शेतकरी कामगार पक्षाने मुंबईतून अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र यामध्ये पक्षाला कधीही यश आलेले नाही. त्यामुळे यंदा मुंबईतून शेतकरी कामगार पक्षाने 1क् उमेदवार रिंगणात उभे केले असून  मुंबईतून खाते उघडण्यासाठी पक्षातर्फे जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती पक्षाच्या कार्यकत्र्यानी दिली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये जोर असणा:या शेकापने अनेकदा मुंबईतही निवडणुका लढवल्या, पण त्यांना कधीही यश आले नाही. पण यंदा पक्षाने मुंबईतून 1क् उमेदवार उभे केले आहेत. 
यामध्ये मालाड पश्चिम येथून अरुणकुमार यादव, दिंडोशीतून जावेद अली, गोरेगावातून विनोद यादव, चांदिवलीत रहिम मोटारवाला, मानखुर्द-शिवाजी नगरमधून रणजीत वर्मा, अणुशक्ती नगरमधून अकबर हुसेन, वांद्रे (पश्चिम) येथून संतोष मरचंडे, सायन-कोळीवाडातून 
नाफीसा खान, मुंबादेवीतून अब्दुल कादीर खान, कुलाबा येथून देवाप्पा राठोड यांचा समावेश आहे. 
निवडणुका जाहीर होण्याच्या सहा महिने अगोदरच पक्षाने या सर्वाची उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हापासूनच उमेदवारदेखील निवडणुकीच्या कामाला लागले 
होते.
199क् पासून पक्षातर्फे मुंबईतून विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. मात्र एकही उमेदवार अद्याप निवडून आलेला नाही. या वर्षी पक्षाने उमेदवारी दिलेल्या 1क् उमेदवारांपैकी किमान 6 ते 7 उमेदवार निवडून येतील, अशी आशा कार्यकत्र्याना आहे. तीन महिन्यांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेमध्ये शेकापने खाते उघडले आहे. 
ट्रॉम्बेतील चित्ता कॅम्प परिसरातील काँग्रेस नगरसेविका हनिफा बी यांचे निधन झाल्यानंतर तीन  महिन्यांपूर्वी या ठिकाणी पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये शेकापकडून खैरुनिस्सा हुसेन यांना उमेदवारी देण्यात आली 
होती. 
यामध्ये त्यांनी बाजी मारत मुंबई महानगरपालिकेत शेकापची पहिली नगरसेविका बनण्याचा मान पटकावला. त्यामुळे पक्षाने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचेच पती अकबर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्यासोबत त्यांची खरी टक्कर होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The scope of the opening of the account in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.