नवीन शैक्षणिक योजनांना कात्री
By Admin | Updated: February 5, 2015 02:25 IST2015-02-05T02:25:47+5:302015-02-05T02:25:47+5:30
सुमारे २,५0१.३५ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांच्याकडे सादर केला.

नवीन शैक्षणिक योजनांना कात्री
टॅबसाठी ३४.३७ कोटी : शिक्षण विभागाचा २,५0१.३५ कोटींचा अर्थसंकल्प सादर
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २0१५-१६ या वर्षाचा सुमारे २,५0१.३५ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांच्याकडे सादर केला. यामध्ये नवीन योजनांसह जुन्या योजनांनाही कात्री लावण्यात आल्याने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची निराशा केली आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब देण्यासाठी अर्थसंकल्पात ३४.३७ कोटींची तरतूद केली असून, पोषण आहार योजनेंतर्गत देण्यात येणारी चिक्की आणि खिचडीसाठी कोणतीच तरतूद केली नसल्याने हा अर्थसंकल्प केवळ दिखाऊ ठरला आहे.
शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे २१ उपक्रमांसाठी निधीची तरतूद केली आहे. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम, सर्व शाळा संगणक व इंटरनेटद्वारे जोडणे, शाळांची डागडुजी आणि पुनर्बांधणी, कॉम्प्युटर लॅबनिर्मिती करणे, शाळांचे हाऊसकीपिंग, विद्यार्थ्यांसाठी बेंच व डेस्क बसविणे, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र, पवई हाय लेव्हल स्काऊट व गाइड कॅम्पस, स्पोर्ट्स कोचिंग सेंटर आदींचा समावेश आहे. पोषण आहारात चिक्की, सुगंधी दूध आदी योजनांना या अर्थसंकल्पात कात्री लावण्यात आली आहे.
व्हर्च्युअल क्लासरूमवर भर
महापालिकेच्या ३६0 प्राथमिक व १२0 माध्यमिक अशा एकूण ४८0 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम यापूर्वीच सुरू आहेत. या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्राथमिक विभागाकरिता १00 व माध्यमिक विभागाकरिता १0२ नवीन व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्याचे ठरविले आहे. यामध्ये प्राथमिक शाळांसाठी ८.८६ कोटी आणि माध्यमिक शाळांसाठी ८.८१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेष, बूट, मोजे, स्कूल किट, वह्या, स्टेशनरी, रेनकोट, छत्र्या व दप्तर यासह इतर शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी अर्थसंकल्पात प्राथमिक शाळांसाठी ८३.८६ आणि माध्यमिक शाळांसाठी १५.२९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सर्व शाळांतील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपशिलाची नोंद ठेवण्यात येणार असून, त्यासाठी शाळेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लॅपटॉप व पेन ड्राइव्ह देण्यात येणार असून, त्यासाठी १२ लाखांची , तर सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या मुदत ठेवीसाठी प्राथमिक शाळांसाठी ५.९0 कोटी आणि माध्यमिक शाळांसाठी ४२ कोटींची तरतूद केली आहे.
शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टींचा समावेश नाही. समिती सदस्यांनाही अनेक मते मांडायची आहेत. या सर्वांचा विचार होऊन अर्थसंकल्पात नवीन योजना आणि उपक्रमांसाठी तरतूद वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे विनोद शेलार यांनी सांगितले.
व्यवसाय करावर पालिकेचा दावा
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत म्हणून व्यवसाय कर वसूल करण्याचे अधिकार पालिकेला देण्यात यावे, अशी विनंती प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे़ या कराच्या माध्यमातून सरकारकडे वार्षिक आठशे कोटी रुपये जमा होत असतात़ हे दर जुने असून या कक्षेखाली येणारी लोकंही मर्यादित आहेत़ त्यामुळे यामध्ये सुधारणा करुन १२०० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत पडतील,
असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला़ त्याचबरोबर रोजगार हमी उपकरापोटी प्राप्त होणारी रक्कम पालिकेकडेच ठेवण्याची विनंतीही शासनाकडे करण्यात आली
आहे़
१६९.२१
कोटींची घट २0१४-१५ या वर्षाच्या तुलनेत शिक्षण विभागाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
२0१५-१६
या शैक्षणिक वर्षात पालिकेच्या मोकळ््या भूखंडांवर १0 नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात २४८.२२ कोटींची तरतूद केली आहे. प्राथमिक शाळांमध्ये १४ हजार ७९१ इकोफ्रेंडली बेंच व डेस्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात ७.२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि एशियाटिक लायब्ररीसाठी ३0 लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.
गरिबांसाठी पॅकेज
गलिच्छ वस्ती व झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता व शौचालय, आरोग्य अशा नागरी सेवासुविधांसाठी ८,४७१़०३ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले आहे़
प्रकार तरतूद
गावठाणे, कोळीवाडे, आदिवासी पाडे २७़१९
आधार केंद्रे २़५९
गलिच्छ वस्त्यांची दर्जोन्नती४४७़६४
चाळींची सुधारणा व देखभाल६८३़९१
प्राथमिक शिक्षण २,५००़९०
माध्यमिक शिक्षण २१७़७१
आरोग्य ३,०४२़३१
सवलतीच्या दराने पाणी १,४३७़३२
इतर १११़४६
एकूण ८,४७१़०३
(आकडेवारी कोटींमध्ये)
जकात कर ६०० कोटींनी तूट तर मालमत्ता कर वसुलीत १०९ कोटी विविध कारणांनी घट झाली असताना विकास नियोजन खात्यात ६३० कोटींची मोठी भर पडली आहे़
1विकास नियोजन खाते - सन २०१४-१५ मध्ये ४,४४४ कोटी अपेक्षित ५,०७४ कोटी मिळाले़
2जकात खाते - सन २०१४-२०१५- ७,८०० कोटी अपेक्षित होते़, यापैकी ७,१०० प्राप्त झाले आहेत़
3मालमत्ता कर - सन २०१४-२०१५- ३,९५६़२८ कोटी अपेक्षित होते, तर ३,८१० कोटी वसूल
बेकायदा बांधकामांना दंड आकारण्यात येणार आहे़
स्वच्छता उपकर आणि अग्निशमन उपकरावर विचार सुरू
मुंबईत १५ लाख झोपडीधारक आहेत़ या झोपड्यांवर मालमत्ता कराची आकारणी करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहे़
विविध परवाना व सेवाशुल्कात वाढ करण्याचे संकेत
म्हाडा आणि एमएमआरडीएच्या वसाहतींमध्ये जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते, दिवाबत्तीसाठी ठरावीक रक्कम आकारण्यात येणार आहे़
अर्थसंकल्पात काय
स्वच्छता अभियानासाठी ७५ कोटी
स्वच्छ अभियानाकरिता ७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाकरिता बांधलेल्या एमएमआरडीए गृह वसाहतीमधील स्वच्छता राखण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली असून, यासाठी २.९० कोटींची तरतूद केली आहे. घरगल्ल्या स्वच्छ करणे आणि घराघरातून कचरा संकलित करण्यासाठी १ हजार १४८ स्वयंसेवकांची नियुक्ती केली असून, यासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. मॅनिंग आणि मॅपिंगसाठी ३५ कोटी, विविध विभागांत अतिरिक्त सुका कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्याकरिता ३ कोटी, कचऱ्यापासून वीजनिर्मितीकरिता ३ कोटींची तरतूद केली आहे. कचरा व्यवस्थापनाकरिता १ कोटींची, मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित होणाऱ्या परिसरात आरोग्यदायक स्थिती सुधारण्यासाठी ७ कोटींची व व्यवस्थापनासाठीचे साहित्य खरेदीसाठी२० कोटींची तरतूद केली आहे.
च्आगामी आर्थिक वर्षातही अंतर्गत निधीतून दोन हजार कोटींचे कर्ज उचलण्यात येणार आहे़
च्गरिबांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी ८,४७१़०३ कोटी रुपयांची तरतूद
च्महसुली उत्पन्न २३,५०९़१० कोटी, महसुली खर्च २१,६७५़४१ कोटी़ आस्थापना खर्च ४७ टक्के
च्बेस्ट उपक्रमासाठी कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाही़ मालमत्ता करातून वाहतूक उपकर लागू करण्याचे संकेत
च्कर्मचाऱ्यांसाठी गट आरोग्य विमा योजनेसाठी ७५ कोटी
च्पालिकेच्या २१६ जुन्या इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी ५३१़८३ कोटींची तरतूद
च्उद्योगधंद्यांना सर्व आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र व इमारत मंजुरीसाठी प्रयत्न
च्सिमेंट व डांबरी रस्ते बांधकामांसाठी २,३०९ कोटीवरून ३,२०० कोटीपर्यंत वाढ़ यात काँक्रीट रस्त्यांसाठी १,१२० कोटी, तर डांबरी रस्त्यांसाठी १,८५४़६९ कोटींची तरतूद़
च्पश्चिम उपनगरांतील नऊ पुलांचे काम, मालाड मीठ चौकी, गोरेगाव बांगूरनगर या ठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधणार - ६८० कोटींची एकूण तरतूद
च्ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी ३७६़४३ कोटी, तर पर्जन्य जलवाहिन्यांसाठी १९६ कोटींची तरतूद़
च्क्षयग्रस्त रुग्णांसाठी इन्टेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिटसाठी एक कोटी, आरोग्य भवन, रक्तपेढी, मानवी दुग्धपेढी, योग थेरपी सेंटर; आरोग्यासाठी ३,३५९ कोटीचा अर्थसंकल्प़
च्तळोजा येथे १२६ हेक्टर क्षेत्रफळाची जमीन संपादित करण्यात येणार आहे, यासाठी एक कोटी
च्सफाई कर्मचाऱ्यांच्या आश्रय योजनेसाठी १९७़६२ कोटी़ हजेरी चौक्यांची पुनर्बांधणी व नूतनीकरण सहा कोटी रुपये
च्घाणीशी संपर्क येणाऱ्या कामगारांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गरिमा अभियान राबविण्यात येणार आहे़
च्मुंबईतील १७९ भूखंडांपैकी शहरात १०, पूर्व उपनगरांत ११, पश्चिम उपनगरांत ४० भूखंडांचा विकास
च्बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणाच्या उपक्रमांना बळकटी देण्यात येणार आहे़
च्मुंबई कल्चरल फेस्टिव्हल प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे़ यासाठी २५ लाख रुपये
च्अग्निशमन दलामध्ये आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी व मिनी बीट स्टेशनसाठी ४८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़
च्डॉकयार्ड येथील बाबू गेनू इमारतीच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी, मंडयांची दुरुस्ती १२ कोटी, देवनार पशुवधगृह नूतनीकरण १० कोटी
च्पाणीपुरवठा खात्यात जलबोगदे, जीर्ण जलवाहिन्या बदलणे व मलनिस्सारण वाहिन्यांची दर्जोन्नती, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प अशा कामांसाठी पाच हजार ७९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे़