मुंबई - ऑनलाइन पैसे पाठवण्याची मर्यादा वाढवण्याचा बनाव करत एका वैज्ञानिकाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार वर्सोवा पोलिसांच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अनोळखी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महेंद्र दारोकार (५६) हे विज्ञान व औद्योगिक अनुसंधान परिषदेत मुख्य वैज्ञानिक आहेत. २० जानेवारीला त्यांनी मुलाला १३ लाख रुपये नेट बँकिंगमार्फत पाठवण्याचा प्रयत्न केला. त्यावर ‘तुमची पैसे पाठवण्याची मर्यादा संपली झाली आहे,’ असा मेसेज त्यांच्या मोबाइलवर आला. त्यानंतर त्यांनी पाच लाख पाठवले. पुन्हा तेवढीच रक्कम पाठवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना परत ‘लिमिट’ संपल्याचा मेसेज आला.
सायबर सेलकडे तक्रारआपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दारोकार यांनी सायबर सेल आणि वर्सोवा पोलिसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएस कायद्याचे कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुगलवरून बँकेचा नंबर मिळवला अन्...पंधरा लाख रुपये पाठवण्याची लिमिट असताना असा मेसेज येत असल्याने त्यांनी गुगलवर जाऊन ऑनलाइन एसबीआय बँक म्हणून नमूद केलेला नंबर डायल केला. तेव्हा फोन उचलणाऱ्या व्यक्तीने त्यांना व्हाॅट्सॲपवर लिंक पाठवून त्यात माहिती भरल्यास पैसे पाठवण्याची व्यवस्था पूर्ववत होईल, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी पासवर्डसह सर्व गोपनीय माहिती लिंकमध्ये भरली. काही वेळाने त्यांच्या खात्यातून दोन व्यवहारांमध्ये ५ लाख २९ हजार ९९५ रुपये ऑनलाइन काढल्याचा मेसेज आला.