शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची प्रतीक्षाच ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST2021-02-05T04:33:50+5:302021-02-05T04:33:50+5:30

२ वर्षांची प्रतिपूर्ती बाकी असल्याने शाळा व्यवस्थापनाकडून संताप व्यक्त सीमा महांगडे मुंबई दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेश ...

Schools waiting for fee reimbursement ...! | शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची प्रतीक्षाच ...!

शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची प्रतीक्षाच ...!

२ वर्षांची प्रतिपूर्ती बाकी असल्याने शाळा व्यवस्थापनाकडून संताप व्यक्त

सीमा महांगडे

मुंबई

दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेश देणाऱ्या शाळांना शैक्षणिक खर्चाच्या प्रतिपूर्तीपोटी १७ हजार ६५० इतकी रक्कम अदा करण्यात येते. अनेकदा त्यामध्ये अनियमितता असल्याने शाळा प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याचे कारण देऊन प्रवेशाना आडकाठी करत असल्याचे दिसून आले आहे. मुंबई जिल्ह्याला अद्याप २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाची प्रतिपूर्तीची रक्कम येणे बाकी असून मागील वर्षांतील काही शिल्लक मिळणे बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. यंदा सुरु झालेल्या प्रक्रियेची प्रतिपूर्तीची रक्कम शाळांची नोंदणी झाल्यावर लगेचच शासनाला कळविली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

अनेक शाळांनी २०१९-२० ची प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याने यंदाच्या वर्षासाठी नोंदणी करण्याचा मार्ग निवडण्याचा विचार केला आहे. आधीच कोरोना काळात विद्यार्थ्यांनी न भरलेल्या शुल्काअभावी शाळा व्यवस्थापनाचे कंबरडे मोडले असून त्यातही प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नाही तर आम्ही नोंदणी करण्यासाठी विचार करू असा पवित्रा मुंबई उपनगरातील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेच्या प्रशासनाने घेतला असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे; मात्र कोरोना काळातील अडचणींमुळे प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना वितरित करता आली नसली तरी येत्या काळात लवकरात लवकर केली जाईल अशी महिती मुंबई उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे.

२०१७-१८ वर्षांत किती मिळाले ?

प्रतिपूर्तीसाठी आवश्यक रक्कम - ८७७३५५९४

संचलनालयाकडून प्राप्त रक्कम - ७३३२७९९३

शाळांना वितरित केलेली रक्कम - ७३३२७९९३

२०१८-१९ वर्षांत किती मिळाले ?

प्रतिपूर्तीसाठी आवश्यक रक्कम - १३१०५७६९५

संचलनालयाकडून प्राप्त रक्कम - ३९४३३०००

शाळांना वितरित केलेली रक्कम - ३९४३३०००

२०१९-२० वर्षांत किती मिळाले ?

२०१९-२० या वर्षांत कोरोना कालखंडामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन कालावधी सुरु झाल्यामुळे प्रतिपूर्तीची रक्कम पुन्हा परत गेली असून शाळांना ती वितरित करणे शक्य झाले नाही. या कारणास्तव २०१९ २० साठी प्रतिपूर्तीची आवश्यक रक्कम आणि येणाऱ्या प्रवेशांसाठीची रक्कम लवकरच प्राथमिक संचलनालयाला कळविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

.....

आरटीई प्रवेशाची माहिती

वर्ष या शाळांची संख्या - उपलब्ध जागा - प्रवेश

२०१७-१८- ३३४- ७४४९-२७९८

२०१८-१९- ३४७-८३७४- ३२३३

२०१९-२०- ३५६- ७४९१- ३४३६

२०२०-२१- ३६७- ७१६२- ३९७७

Web Title: Schools waiting for fee reimbursement ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.