Join us  

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच, ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:58 PM

Mumbai School News : मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुंबईचे पालिका आयुक्ता इक्वाल सिंह चलह यांनी दिले आहेत.

मुंबई - कोरोना विषाणूचा फैलावानंतर बंद करण्यात आलेल्या शाळा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या घटल्याने शाळा सुरू होणार का याबाबत पालकवर्गामध्ये उत्सुकता होता. मात्र मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुंबईचे पालिका आयुक्ता इक्वाल सिंह चलह यांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीयरीत्या घट झाली आहे. मात्र दिवाळी आणि सणावारांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीची बाब म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ३१ दिवसांपर्यंत बंद ठेवण्याची घषोणा केली आहे. तसेच २३ नोव्हेंबरपासून सुरू होणारे ९ ते १२वीचे वर्गही सुरू न करण्याचे आदेशा पालिका आयुक्तांनी दिले आहे. 

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार! - वर्षा गायकवाड  मुंबई -  महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे. 

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :शाळाशिक्षण क्षेत्रमुंबई